ठाणे- दुपारच्या उकाड्याने कासावीस झालेल्या विषारी बिन विषारी सापाने बिळातून बाहेर पडत थंड ठिकाणाच्या शोधात मानवी वस्तीत घुसल्याचे अनेक घटना समोर येत आहेत. अशाच दोन घटना मंगळवारी कल्याण पश्चिम परिसरातील घडल्या आहेत.
थंड ठिकाणाच्या शोधात सापांची धाव मानवी वस्तीकडे; २० दिवसात २५ सापांना जीवदान - siddharth kamble
थंड ठिकाणाच्या शोधात मानवी वस्तीत घुसल्याचे अनेक घटना समोर येत आहेत.
जिल्ह्यात गेल्या २० दिवसांपासून उन्हाचा पारा चडल्याने नागरिकांसह मुक्या प्राणांचाही जीव कासावीस होत आहे. अशात कल्याण पश्चिमेकडील कोळीवली गावात व्हिजन स्कूलच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरु आहे. या ठिकाणी लिफ्टच्या खड्ड्यात पाणी साचलेल्या ठिकाणी गारवा निर्माण झाला आहे. बहुदा कडक उन्हामुळे या सापाचा जीव बिळात कासवीस झाल्याने त्याने बिळातून बाहेर पडून तो थंड ठिकाणच्या शोधात या पाणी साचलेल्या डबक्यात नाग वेटोळे घालून बसला होता. ही घटना येथील कामगारांनी कळताच त्यांनी साईट सुपरवायझर प्रवीण तोशिवाल यांना माहिती दिली. त्यांनी सर्पमित्र दत्ता बोंबे यांना माहिती दिली. माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता यांनी घटनास्थळी येवून या विषारी नागाला पकडले. हा नाग ४ फुटांचा असून कोब्रा जातीचा आहे. विशेष म्हणजे उन्हाचा फटका या सापाला बसल्याने तो पाण्याच्या डबक्यात गेला असावा, असे सर्पमित्र दत्ता याने सांगितले.
दुसऱ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील आरटीओ कार्यलयानजीक बिर्ला कॉलेज रोडवरील एका चाळीत तेजश्री बाटे आपल्या कुटुंबासह राहतात. सायंकाळी किचनमध्ये त्या पाणी आण्यासाठी गेल्या असता त्यांना भलामोठा चटयाबत्याचा साप किचन ओट्यावरील हंडाच्या मागे दिसला. या सापाला पाहून त्यांनी घराबाहेर धूम ठोकली होती. घर मालकाने किचन ओट्यावर साप घुसल्याची माहिती सर्पमित्र हितेशला दिली. हितेशने घटनास्थळी येवून या सापाला पकडून पिशवीत बंद केले. हा कवड्या जातीचा साप असून ५ फुट लांबीचा आहे. या दोन्ही सापाला वन अधिकाऱ्यांनी परवानगी घेवून जंगलात सोडणार असल्याची माहिती सर्पमित्रांनी दिली.