महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेना उमेदवार विचारेंच्या प्रचार रथाला वाघबीळ ग्रामस्थांचा ब्रेक.. पोलिसांशी भिडल्या महिला ग्रामस्थ

क्लस्टर मधून पाडे, कोळीवाडे वगळण्याची मागणी, वॉटरफ्रंट डेव्हलोपमेंट, मेट्रो कास्टिंग यार्ड आणि इतर प्रकल्पना ग्रामस्थांचा विरोध होता. याच कारणास्तव ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्र घेतला. निवडून आल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी पाच वार्षत कधीही डुंकून पहिले नाही. यामुळे वाघबीळ ग्रामस्थांनी उमेदवार राजनविचारे यांचा निषेध नोंदवत प्रचार रथाला अडथळा निर्माण केला.

शिवसेना उमेदवार विचारेंच्या प्रचार रथाला वाघबीळ ग्रामस्थांचा ब्रेक.. पोलिसांशी भिडल्या महिला ग्रामस्थ

By

Published : Apr 24, 2019, 11:12 AM IST

ठाणे - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्यात आला असतानाच शिवसेनेचे ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांना भूमिपुत्र आणि गावकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. मंगळवारी ठाण्याच्या वाघबीळ गावात प्रचार रथ घेऊन पोहचलेल्या विचारेना ग्रामस्थांनी विरोध दर्शवत जाब विचारला आणि प्रचाररथाला ब्रेक लावला. ग्रामस्थांच्या विरोधात महिला पोलिसांना महिला ग्रामस्थ भिडल्याचा व्हिडियो व्हायरल झाला आहे. ग्रामस्थांच्या विरोधाच्या सुराने राजन विचारेना लोकसभा निवडणुक महागात पडण्याची आणि फटका बसण्याची चिन्हे गडद झाली आहेत.

शिवसेना उमेदवार विचारेंच्या प्रचार रथाला वाघबीळ ग्रामस्थांचा ब्रेक.. पोलिसांशी भिडल्या महिला ग्रामस्थ

क्लस्टर मधून पाडे, कोळीवाडे वगळण्याची मागणी, वॉटरफ्रंट डेव्हलोपमेंट, मेट्रो कास्टिंग यार्ड आणि इतर प्रकल्पना ग्रामस्थांचा विरोध होता. याच कारणास्तव ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा पवित्र घेतला. निवडून आल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी पाच वार्षत कधीही डुंकून पहिले नाही. यामुळे वाघबीळ ग्रामस्थांनी उमेदवार राजनविचारे यांचा निषेध नोंदवत प्रचार रथाला अडथळा निर्माण केला. प्रचार रथ वाघबीळ गावात जाताच ग्रामस्थ महिला आणि पुरुषांनी निषेध नोंदवत विरोध केला.

यावेळी महिला पोलिसांशी वाघबीळातील महिला भिडल्या काही प्रमाणात धक्काबुक्कीही झाल्याचे चित्र आहे. राजन विचारे याना विरोध दर्शवत यापूर्वीच ग्रामस्थांच्या संघटनेने मतदानावर बहिष्कार घालण्याचा पवित्र घेतला आहे. वाघबीळ गावात मात्र, चक्क नागरिकांनी विरोध दर्शविल्याने आता उमेदवार राजन विचारे याना निवडणुकीत अकार्यक्षमतेमुळे विरोध आणि फटका बसण्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details