महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Citizen death in CMs Event Thane: विजेचा शॉक लागूनही मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम सुरुच राहिला...नागरिकाचा अखेर रुग्णालयात मृत्यू - रामजियावन विश्वकर्मा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिव्यातील लोकार्पण कार्यक्रमाला गालबोट लागले आहे. कार्यक्रमादरम्यान एका नागरिकाचा विजेचा शॉक लागून मृत्यु झाला आहे.

Citizen death due to electric shock
विजेचा शॉक लागुन नागरीकाचा मृत्यु

By

Published : Jun 8, 2023, 1:32 PM IST

Updated : Jun 8, 2023, 2:44 PM IST

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरू असताना नागरिकाला लागला विजेचा शॉक

ठाणे :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिव्यातील नवीन कामांचा शुभारंभ तसेच विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम बुधवारी सायंकाळी आयोजित केला होता. कार्यक्रम सुरू असताना रामजियावन विश्वकर्मा रा. श्लोकनगर, मुंब्रादेवी कॉलनी दिवा या 55 वर्षीय व्यक्तीला विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. शॉक लागल्यानंतर विश्वकर्मा यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.



उपचारादरम्यान झाला मृत्यू : कार्यक्रमादरम्यान स्थानिक खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरु असताना 55 वर्षीय विश्वकर्मा यांना विद्युत शॉक लागला होता. ८ वाजून ४५ मिनिटांनी हा प्रकार घडल्याची पोलिसांकडे नोंद आहे. यावेळी खासदार कार्यक्रमात काहीही होणार नसल्याचे उपस्थितांना सांगत होते. तसेच पोलिसांनी काय झाले पाहण्याचे आवाहन करत होते. याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, जखमी विश्वकर्मा यांना त्याच्या मुलाने नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. ते चुकून एका खांबाच्या संपर्कात आल्याने तो जखमी झाले. त्या खांबातून विद्युत प्रवाह वाहत होता.

अनैसर्गिक मृत्यूची नोंद : त्या व्यक्तीला कळवा येथील नागरी रुग्णालयात नेण्यात आले होते, असे ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. या घटनेनंतर असेही सांगितले जात आहे की, मुख्यमंत्र्यांचे पुत्र आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे. या कार्यक्रमासाठी मोठा जन समुदाय जमलेला होता. ही घटना घडली तेव्हा खासदार शिंदे भाषण करत होते. त्यांनी पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी तात्काळ जाण्यास सांगितले. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात असा अनुचित प्रकार घडल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

हेही वाचा :

  1. Maharashtra Cabinet Expansion : मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? फडणवीसांनी थेटच सांगितले....
  2. Maharashtra Politics: आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार, बहुमताने जिंकणार- दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा दावा
  3. CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तातडीने दिल्लीला होणार रवाना; राजकीय चर्चांना उधाण
Last Updated : Jun 8, 2023, 2:44 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details