महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

क्रिकेट खेळताना मुलाच्या हातात घुसली लोखंडी गेटची सळई

क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाच्या हातामध्ये सोसायटीच्या लोखंडी गेटची सळई घुसल्याची घटना दुपारी घडली.

क्रिकेट खेळताना मुलाच्या हातात घुसली लोखंडी गेटची सळई

By

Published : Apr 30, 2019, 8:48 PM IST

ठाणे- क्रिकेट खेळत असताना चेंडू आणण्यासाठी गेलेल्या ११ वर्षीय मुलाच्या हातामध्ये सोसायटीच्या लोखंडी गेटची सळई घुसल्याची घटना दुपारी घडली. ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन मुलाची सुखरूप सुटका करुन त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले. हर्ष राजेश शिंदे (वय ११, रा.लुईसवाडी) असे जखमी मुलाचे नाव आहे.

उन्हाळ्याची सुट्टी पडल्याने शाळकरी मुले सोयायटीच्या आवारात क्रिकेट खेळतात. हर्ष हाही आपल्या मित्रांसमवेत क्रिकेट खेळत होता. त्यावेळी चेंडू घरोडिया अपार्टमेंट या सोसायटीमध्ये गेला. त्यावेळी चेंडू आणण्यासाठी गेल्यावर सोसायटीच्या गेटवरून उडी मारत असताना गेटवरील धारदार लोखंडी सळई हर्षच्या उजव्या हातात आरपार घुसली.

त्यावेळी सोबतच्या मित्रांनी स्थानिकांना बोलवले. तसेच अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापनाने जखमी हर्षची मुक्तता करून त्याला रुग्णालयात दाखल केले. हर्षच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याचे त्याच्या पालकांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details