महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Cheating With Jeweler Owner: महिलेच्या आवाजात बोलून ज्वेलर्स मालकाची फसवणूक; दोन भामट्यांना अटक - Two accused arrested in Meera Bhayander

हुबेहूब महिलांच्या आवाजात बोलून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दोन भामट्यांना काशी मीरा गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी मुंबईच्या आजूबाजूच्या शहरातील नागरिकांची फसवणूक केली आहे. अशीच एक घटना नवघर पोलीस ठाणे हद्दीमध्ये घडली होती. या प्रकरणाचा तपास काशीमीरा गुन्हे शाखा करत होती. प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

Cheating With Jeweler Owner
दोन भामट्यांना अटक

By

Published : May 11, 2023, 5:53 PM IST

ज्वेलर्स मालकाच्या फसवणूक प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

मीरा भाईंदर (ठाणे): पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेच्या श्रीराम ज्वेलर्सचे मालक यांचेशी आरोपीने महिलेच्या आवाजात फोनद्वारे संपर्क केला. ती डॉक्टर असल्याचे बोलत तिला ४ तोळे वजनाच्या बांगड्या बनवायची ऑर्डर देण्याचे खोटे सांगून फिर्यादीस साई आशिर्वाद हॉस्पिटल येथे बोलावले. भामट्यांनी २ लाख एडव्हॉन्स देते व हॉस्पिटलसाठी २ लाख रुपये सुट्टे करण्याचा बहाणा केला. फिर्यादी हे २ लाख रुपये सुट्टे घेऊन साई आशिर्वाद हॉस्पिटल येथे गेले. यावेळी आरोपींनी फिर्यादीस डॉक्टर मॅडमने सांगितलेली रक्कम आमच्याकडे द्यावी आणि तुम्ही मॅडमची बांगड्याची साईज घेऊन या, असे सांगितले. त्यानुसार फिर्यादी ज्वेलर्स मालकाने २ लाख रुपये भामट्यांना सोपविले. यानंतर दोन्ही आरोपी भामटे घटनास्थळावरून निघून गेले.

दोघांना अटक: आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर फिर्यादीने नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या गुन्ह्याचा गुन्हे शाखा, कक्ष १ काशिमीरा समांतर तपास करत होते. त्यांनी महिलेच्या आवाजात बोलून फसवणुकीचा गुन्हा करणारे आरोपी मनिष शशीकांत आंबेकर (रा. नागीनदासपाडा, नालासोपारा पूर्व) आणि अन्वर अली कादीर शेख (रा. कर्जत, जि. रायगड) या दोघांना अटक केली. याप्रकरणी त्यांच्याकडून रोख रक्कम ९,५५० रुपये व ३ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.


'या' ठिकाणी केले होते गुन्हे:आरोपींनी नवघर, भाईंदर, आचोळे, दादर, मुंबई, लोणीकंद, पूणे ज्वेलर्स, सहकार नगर, पुणे येथे मेडीकल, स्वारगेट, पुणे येथील रक्ताच नाते रक्तपेढी , कोपर खैराणे, नवी मुंबई छत्रपती संभाजी महाराज पतपेढी, खांदेश्वर, नवी मुंबई मेडिकल, खांदेश्वर, नवी मुंबई मराठा ज्वेलर्स, मुंबई नाका, नाशिक चितळे स्वीट, कळंबोली येथे राधिका ज्वेलर्स, शिवाजी चौक पनवेल ज्वेलर्स दुकानदार, शाहुपूरी, कोल्हापूर वेलनेस मेडिकल, मिरारोड, शांतीपार्क येथील शबनम ज्वेलर्स तसेच गुजरात राज्य येथील १ वापी, बलसाड, काकोदरा, सुरत सिटी व सूरत रेल्वे स्टेशन जवळील जनरल स्टोर्स येथे अशा एकूण १९ ठिकाणी गुन्हे केल्याची माहिती दिली आहे. या ठिकाणांपैकी खालीलप्रमाणे ५ पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद असून उर्वरीत १४ पोलीस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल आहेत.


'या' पोलिसांनी बजावली कामगिरी:ही कामगिरी अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, अमोल मांडवे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १, काशिमीराचे पो.नि. अविराज कुराडे, स.पो.नि. कैलास टोकले, पुष्पराज सुर्वे, स. फौ संदीप शिंदे, किशोर वाडीले, संजय पाटील, पो.हवा. संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, विजय गायकवाड, सचिन सावंत, प्रफुल्ल पाटील, समीर यादव, पो.अम. प्रशांत विसपुते, सनी सुर्यवंशी तसेच पो. अंम., कुणाल सावळे, सायबर विभाग यांनी केली आहे.

हेही वाचा:

  1. Narayan Rane On Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले; नारायण राणेंनी डिवचले
  2. CM DCM on SC Verdict : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; आम्ही समाधानी, नैतिकता आम्हाला शिकवू नका
  3. Prithviraj Chavan On Thackeray Resignation: मी बोललो होतो, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला नको होता- पृथ्वीराज चव्हाण

ABOUT THE AUTHOR

...view details