नवी मुंबई -नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी नवी मुंबई, उरण आणि पनवेलमधील प्रकल्पग्रस्तांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या 24 जूनला नवी मुंबई व परिसरात आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. नवी मुंबईत या दिवशी अवजड वाहनांना प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहतुकीमध्ये बदल
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक व्यवस्थेमध्ये बदल करण्यात आला आहे. 24 जून रोजी सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत अवजड वाहनांना महापालिका क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.