ठाणे- मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेची सेवा अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली. त्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यास उशीर झाला आहे. तर कल्याणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या उशिराने धावत आहेत. त्यामुळे महिलांना महिला डब्ब्यात चढताना आणि उतरताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मुंबई : गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, महिलांची चेंगरा-चेंगरी - मध्य रेल्वे
मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या मध्य रेल्वेची सेवा अर्धा ते पाऊण तास ठप्प झाली.
मुंबई : गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेचा खोळंबा, महिलांची चेंगरा-चेंगरी
रेल्वेत महिलांच्या डब्यात चढताना महिलांची चेंगरा-चेंगरी होताना दिसत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रेल्वे पोलीस महिलांच्या गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत.