महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Case Registered : पोलीसाचा खबरी असल्याच्या संशयातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण ; अमलीपदार्थ तस्करासह तिघांवर गुन्हा - मोहम्मद हुसेन मुनावर शेख उर्फ अण्णा

कोनगावातील म्हात्रे कॉम्प्लेक्समध्ये पोलिसाचा खबरी असल्याच्या संशयातून रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात (drug smugglers beat rickshaw driver) आली. या प्रकरणी बेदम मारहाण करणाऱ्या अमलीपदार्थ तस्करासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला (case registered against drug smugglers) आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहे.

case registered against drug smugglers
अमली पदार्थ तस्करांवर गुन्हा दाखल

By

Published : Dec 10, 2022, 8:04 AM IST

ठाणे : पोलिसाचा खबरी असल्याच्या संशयातून रिक्षाचालकाला कारमधून नेत एका घरात कोंडून बेदम मारहाण केल्याची घटना घडली (drug smugglers beat rickshaw driver) आहे. ही घटना कोनगावातील म्हात्रे कॉम्प्लेक्समध्ये घडली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात बेदम मारहाण करणाऱ्या अमलीपदार्थ तस्करासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद हुसेन मुनावर शेख उर्फ अण्णा असे गुन्हा दाखल झालेल्या अमलीपदार्थ तस्कराचे नाव (case registered in market police station) आहे.

गुन्हा दाखल :तक्रादार अमान रफिक शेख (36)हा कल्याण पश्चिम भागातील रेतीबंदर परिसरातील चाळीत कुटूंबासह रहातो. ८ डिसेंबरला अमान हा मित्राच्या घरी गप्पा मारत बसला असतानाच, मध्यरात्रीच्या सुमारास मुख्य आरोपी अण्णा हा त्याचे साथीदार शोएब पोखे , शरीफ यांच्यासह अमानकडे आला. आणि त्याला गोड बोलून बहाण्याने मारोती झेन कारमध्ये बसून कोनगावातील खाडी किनारी असलेल्या म्हात्रे कॉम्प्लेक्समधील ई विंग मधील तळ मजल्याच्या फ्लॅटवर घेऊन आले. त्यानंतर आरोपी अण्णा याने अमानशी वाद घालून तू पोलिसांचा खबरी आहेस, आम्ही काय करतो ती सर्व माहिती तू पोलिसांना देतो, असे बोलून त्याला फ्लॅटचा दरवाजा बंद करून आरोपी अण्णा आणि त्याच्या दोन साथीदारांनी अमानला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. दरम्यान पोलिसात तक्रार देण्यास जाणार असल्याने अमानला दुसऱ्या दिवशी दुपारपर्यत फ्लॅटमध्ये कोंडून ठेवले होते. मात्र आरोपींच्या तावडीतून कसाबसा सुटून त्याने बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून मारहाण करणाऱ्या अण्णा व त्याच्या दोन साथीदारांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत (case registered against drug smugglers) आहे.


दिखावा कारवाई :विशेष म्हणजे अमलीपदार्थ तस्कर अण्णा हा कोनगावातील म्हात्रे कॉम्प्लेक्स परिसरात गेल्या ८ ते १० वर्षापसून चरस, गांजासह नशा आणणाऱ्या अमलीपदार्थची मोठ्या प्रमाण विक्री करीत असल्याने कोनगाव पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात डझनभर गुन्हे दाखल आहेत. शिवाय म्हात्रे कॉम्प्लेक्स खाडी किनारी असल्याने हा संपूर्ण परिसरात नशेबाजच्या विळख्यात अडकल्याने येथील रहिवाशी संघटनानी त्याच्या विरोधात तक्ररी करून त्याचा अमलीपदार्थ विक्रीचा गोरखधंदा बंद करण्याची मागणी केली. मात्र पोलीसही दिखावा कारवाई करीत असल्याने त्याचा गोरखधंदा आजही परिसरात सुरुच आहे. या परिसरात मुब्रा, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, उल्हासनगर आदी भागातून नशेबाज याठिकाणी नश्या करण्यासाठी येत असल्याची माहिती जागृत रहिवाशाने दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details