महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि खाजगी बसचा भीषण अपघात - मुंबई नाशिक महामार्गावर अपघात बातमी

कार आणि खाजगी बसमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना मुंबई-नाशिक महामार्गावर घडली आहे. या अपघातात कारमधील चार जण ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे.

car-and-private-bus-accident-on-mumbai-nashik-highway
मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि खाजगी बसचा भीषण अपघात

By

Published : Feb 1, 2021, 9:21 AM IST

Updated : Feb 1, 2021, 9:36 AM IST

ठाणे -मुंबई-नाशिक महामार्गावर कार आणि खाजगी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील चार जण ठार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. गोकूळ मधुकर गवते (29), रा. पिंपळगाव सिन्नर, नाशिक, पंकज भगीरथ जावडे (29), रा. अहमदनगर, ज्वाला विजय बहादूर सिंग (27), रा. नाशिक, गौरव सुधीर सिंग (27), रा. नाशिक, असे मृत्यू झालेल्यांची नावे आहे.

अपघातात चार जण ठार -

मुंबई-नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पिंपळासजवळ नाशिकहून मुंबईला जाणारी कार आज पहाटेच्या सुमारास भरधाव वेगाने येत होती. त्यावेळी पिंपळास गावाच्या हद्दीत येताच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्यामधील दुभाजकावर आढळून विरुद्ध दिशेला फेकल्या गेली. त्याचवेळेस मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या एका खाजगी बस आणि या कारमध्ये जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघातात एवढा भयंकर होता की, कारचा चेंदामेंदा होऊन कारमधील चार जण ठार झाले. दरम्यान, अपघातात ठार झालेल्यांची नावे अद्यापही पोलिसांना कळाली नसून घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केले आहे.

हेही वाचा - Budget 2021 : नेमका कसा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या अर्थतज्ज्ञांकडून

Last Updated : Feb 1, 2021, 9:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details