महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यातील १७ व्या शतकातील तोफा घेणार मोकळा श्वास - तोफा

ठाण्यातील भूईकोट किल्लाच्या सुरक्षेसाठी पोर्तुगिज बनावटीच्या ऐतिहासिक तोफांचे लवकरच संवर्धन होणार आहे. हे तोफे पर्यटकांना पाहण्यासाठी दर्शनी भागावर ठेवण्यात येणार आहेत.

पुरातन तोफा होणार संरक्षित

By

Published : May 25, 2019, 3:28 PM IST

ठाणे- शहरातील भूईकोट किल्लाच्या (आत्ताचे सेंट्रल जेल) सुरक्षेसाठी पोर्तुगिज बनावटीच्या ऐतिहासिक तोफांचे लवकरच संवर्धन होणार आहे. या तोफा पर्यटकांना पाहण्यासाठी दर्शनी भागावर ठेवण्यात येणार आहेत. खाडी किनारी मातीमध्ये उलट्या गाडण्यात आलेल्या तोफा आता लवकरच जमिनीवर मांडण्यात येणार असल्याने ते मोकळा श्वास घेणार आहेत.

पुरातन तोफा होणार संरक्षित

पुरातत्व विभाग, ठाणे महानगर पालिका, मेरिटाईम बोर्ड आणि दुर्गवीर प्रतिष्ठानने या कामासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गड संवर्धन समितीचे कायकर्ते शनिवार आणि रविवार दोन दिवस या तोफा काढणार आहेत. सुरुवातीला १३ पैकी ६ तोफा काढून त्या सुशोभित करण्यात येणार आहेत.

निसर्गाचे वरदान मिळालेल्या ठाणे शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अनेक ऐतिहासिक गोष्टींच्या खाणाखुणा आजही येथे आढळून येतात. ठाण्यातील मध्यवर्ती कारागृह हासुद्धा इतिहासाचाच एक भाग आहे. पुर्वीचा भूईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध असलेल्या या किल्ल्याच्या संरक्षणासाठी सुमारे ४० तोफा तैनात ठेवण्यात आल्या होत्या, असे जाणकार सांगतात.

पोर्तुगिज आणि अरेबियन लोक १६ व्या शतकात या बंदराचा व्यापारासाठी वापर करीत होते. व्यापारी जहाजे बांधण्यासाठी काही तोफांचा वापर केला जात असे. सध्या येथे अवघ्या ११ तोफा मातीमध्ये उलट्या गाडलेल्या आहेत. काळाच्या ओघात आणि पुरातत्व खाते व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दुर्लक्षामुळे सध्यस्थितीत या तोफांची माती होऊ लागली आहे.

त्यामुळे गड संवर्धन समितीने पुढाकार घेऊन या तोफांचे जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठाण आणि चेंदानी कोळीवाडा समितीने पुढाकार घेऊन या तोफांची निगा राखण्यासाठी पुढाकार घेतला आहे. पुरातत्व विभागाच्या परवानगीने या तोफा जमिनीबाहेर काढून मोकळ्या जागेत ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी ठाणे महानगर पालिका, मेरिटाइम बोर्ड यांचेही सहकार्य लाभणार आहे. सुरुवातीला ६ तोफा काढण्यात येणार असून विसर्जन घाट इथे महापालिकेने बांधलेल्या चौथऱ्यावर त्या सुशोभीत करण्यात येणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details