ठाणे : गेल्या काही वर्षांत संपूर्ण भारतात कर्करोगाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी कॅन्सर किंवा कर्करोग हा फार क्वचित होणारा रोग होता. कॅन्सर झाला कि ती व्यक्ती दगावतेच असा एक समज समाजामध्ये पसरलेला होता. कॅन्सर या आजाराबद्दल लोकांमध्ये खूप गैरसमज होते. त्यामुळे ज्या आजाराकडे अत्यंत भीतीयुक्त नजरेने पाहिले जात होते. परंतु मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे आणि बदललेल्या जीवनशैलीमध्ये हा रोग आता घरोघरी पोहोचल्याचे विदारक दृश्य सध्या सर्वत्र दिसत आहे. 2020 ते 2023 च्या आकडेवारीनुसार कर्करोग ग्रस्तांमध्ये 100.4 टक्के वाढ झाल्याची खळबळजनक आकडेवारी समोर आली आहे. तर या रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी कडक उपाययोजना करावे असे मत, डॉक्टर श्रद्धा ठक्कर यांनी व्यक्त केले आहे.
मोबाईलचा अतिवापर :जागतिक आकडेवारीनुसार कॅन्सरग्रस्तांच्या वाढीच्या बाबतीत भारत, अमेरिका आणि चीनच्या तिसऱ्या स्थानी आला आहे. मोबाईलचा अतिवापर आणि प्रत्येक इमारतीवर उभारलेले मोबाईल टावर यामुळे रेडिएशनच्या प्रमाणात वाढ झाल्याचे तज्ञ सांगतात. अतिशय लहान वयापासून छोट्या मुलांना हातात मोबाईल दिला जातो. ज्यामुळे त्यांच्या कोवळ्या शरीरावर रेडिएशनचा मारा सुरू होतो. युवा पिढी मोबाईल गेम्सच्या आहार गेली आहे. बाहेर मोकळ्या हवेत फिरण्याऐवजी तासनतास मोबाईलवर असल्याने, अनेक प्रकारच्या कर्करोगाचे शिकार होतात. महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोग होण्याचे प्रमाण मोठे आहे. लंग कॅन्सर, कोलोरेकटल आणि ब्लड कॅन्सर अशा प्रकारच्या रोगांचा प्रसार जास्त प्रमाणात होत आहे. त्यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.