महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 15, 2023, 7:34 PM IST

ETV Bharat / state

Cab Driver Rape Attempt : धक्कादायक! धावत्या कारमध्ये चालकानं केला तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

Cab Driver Rape Attempt : धावत्या कारमध्ये कॅब चालकाकडून एका २३ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील कल्याण-शीळ मार्गावरील सूचक नाका परिसरात शनिवारी पहाटे घडली आहे. याप्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कॅब चालकावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. राकेश मिश्रा असे कारसह फरार झालेल्या कॅब चालकाचे नाव आहे.

Cab Driver Rape Attempt
तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

ठाणे : Cab Driver Rape Attempt : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित २३ वर्षीय तरुणी ही कल्याण पूर्वेतील नेतेवली भागात राहत असून ती नवी मुंबई येथील एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. ती नवी मुंबई येथे नेहमीप्रमाणे शुक्रवारी कामावर गेली होती. त्यानंतर (शनिवारी) १४ ऑक्टोबर पहाटेच्या सुमारास कंपनीमधील काम आटोपून घरी जाण्यासाठी पीडितेने कार बूक केली होती. कारमध्ये बसून ती घराच्या दिशेनं प्रवास करत असताना, कार कल्याण-शीळ मार्गावरील सूचक नाका येथे आली. यावेळी नराधम कॅब चालक राकेशने पीडित तरुणीवर कारमध्येच अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. या घृणास्पद कृत्यामुळे पीडित तरुणीने आरडाओरडा केला. त्यावेळी घाबरलेल्या कॅब चालकाने पीडित तरुणीला पहाटेच्या तीन वाजल्याच्या सुमारास सूचक नाका रस्त्यावर सोडून पळ काढला होता.

कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा : दरम्यान, या घटनेनंतर भयभीत झालेल्या पीडित तरुणीने कोळशेवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी कॅब चालकाविरोधात भादंवि कलम ३५४, ५०९ प्रमाणे गुन्हा दाखल केला. या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशुमख यांच्याशी संपर्क साधला असता, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कॅब चालकावर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कुठल्या दिशेला गेली हे दिसून आले आहे. तसेच पोलीस पथक सध्या फरार कॅब चालक राकेश मिश्राचा शोध घेत असल्याची माहिती दिली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. डी. डोके करीत आहेत. मात्र, या घटनेमुळे महिला प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून कॅब चालकावर गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये कार कुठल्या दिशेला गेली हे दिसून आले आहे. तसेच पोलीस पथक सध्या फरार कॅब चालकाचा शोध घेत आहेत - महेंद्र देशुमख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळशेवाडी पोलीस स्टेशन

धावत्या कॅबमध्ये महिलेचा विनयभंग : याआधीही अशा प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. पालघर जिल्ह्यात डिसेंबर, 2022 रोजी अशीच एक धक्कादायक घटना घडली होती. एक महिला आणि तिची मुलगी पेल्हारहून वाडा येथे एका कॅबमथून परतत असताना, सहप्रवाशांनी महिलेचा विनयभंग केला होता. तिच्या दहा महिन्यांच्या मुलीला कॅबमधून बाहेर फेकले होते. त्यामुळे त्या मुलीचा जागीच मृत्यू झाला होता. महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी विजय कुशवाहाविरुद्ध पीएस मांडवी, पालघर जिल्ह्यात 304 आणि 354 IPC नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा:

  1. Molestation By Driver : चालत्या वाहनात महिलेचा विनयंभग करून चिमुकलीला फेकले, कॅब चालकाविरोधात गुन्हा दाखल
  2. Chembur Murder Case : टॅक्सी चालकाकडून पत्नीचा भररस्त्यात खून; चेंबूरमधील खळबळजनक घटना
  3. वाढदिवसाला कपडे भेट देऊन दाजीचा अल्पवयीन मेहुणीवर कारमध्ये बलात्कार, बुलडाण्यातील प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details