नवी मुंबई :नवी मुंबईतील नेरूळ परिसरातील सेक्टर 6 मधील सरसोळे येथील चार मजली इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडलीय. या दुर्घटनेत एक महिला व एक पुरुष अशा दोन व्यक्तींचा मृत्यू झालाय. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्तींना जवळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
काय आहे प्रकरण ?नेरुळ नवी मुंबई सारसोळे गाव येथील सेक्टर 06 येथील तुलसी भवन, प्लॉट नंबर 313 या इमारतीच्या सी विंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर म्हात्रे कुटूंबाच्या घराच्या नुतनीकरणाचं काम सुरू होतं. त्याठिकाणी तीन कामगार काम करीत होते. अचानक लादी बसवण्याचं काम सुरू असतानाच 9 वाजण्याच्या सुमारास स्लॅब कोसळला. त्यानंतर उर्वरित खालच्या मजल्यावरील देखील स्लॅब कोसळत गेले. या दुर्घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये बाबासाहेब शिंगाडे, असं एका मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच नाव समोर आलंय. तर अन्य चार व्यक्ती गंभीर जखमी झाले आहेत. आणखी व्यक्ती या इमारतीच्या खाली दबले आहेत का, याचा शोध अग्निशमन दलाचे जवान घेत आहेत.
Nerul Building Collapse: काम सुरू असताना कोसळला चार मजली इमारतीचा स्लॅब; दोघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी - नवी मुंबईत इमारतीचा स्लॅब कोसळला
नवी मुंबईमधील नेरुळ परिसरातील एका चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झालाय. ही घटना बुधवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास झाली. तर चौघे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
Published : Aug 24, 2023, 7:04 AM IST
|Updated : Aug 24, 2023, 7:57 AM IST
इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविले :घटनेचं गांभीर्य ओळखून घटनास्थळी मनपाच्या रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान, मनपाचे अधिकारी व पोलीस प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना जवळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवी मुंबईचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी घटनास्थळी भेट दिलीय. सुरक्षतेची खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत रिकामी करण्यात आलीय. त्या इमारतीतील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. त्याचबरोबर गुरुवारी स्ट्रक्चरल ऑडिट करणार असल्याचं आयुक्तांनी सांगितलंं आहे.
इमारतीच्या निकृष्ट बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर :गेल्या वर्षी जून महिन्यात नेरुळ येथील पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळला होता. या अगोदर देखील नेरुळ येथील एका पाच मजली इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली होती. यामुळे नवी मुंबईत इमारतीच्या निकृष्ट बांधकामाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.
हेही वाचा :
- Building Collapse in Bhayandar East: भाईंदर पूर्वमध्ये इमारतीचा सज्जा कोसळून तिघेजण जखमी
- Bhiwandi Building Collapse: भिवंडीत इमारत दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती; २७७ बेकायदा टॉवर देत आहेत मृत्यूला निमंत्रण
- Building Collapsed In Bhiwandi: इमारतीच्या ढिगाऱ्याखालून २० तासानंतर सुटका, बचाव पथकाने जन्मदिनीच दिले 'जीवदान'