ठाणे - आधी लगीन लोकशाहीचं, मग माझं.. असे म्हणत नववधुंनी मतदान केले. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहापूर तालुक्यात नडगाव गावातील कोमल व काजल या नववधु भागिनींनी मतदानाचा अधिकार बजावला. मतदानानंतर त्यांनी इतरांही मतदान करण्याचे आवाहन केले.
भिवंडी मतदारसंघ : 'आधी लगीन लोकशाहीचं, मग माझं', नववधु भागिनींनी मतदानाचा बजावला हक्क - cast
भिवंडी मतदारसंघात नववधु भागिनींनी मतदानाचा बजावला हक्क बजावला. यानंतर त्यांनी इतरांही मतदान करण्याचे आवाहन केले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे आणि भाजपचे उमेदवार खासदार कपिल पाटील यांच्यामध्ये ‘काटे कि टक्कर’ होत आहे. आज सकाळपासून मतदान सुरु झाले. मात्र ग्रामीण भागात गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदा मात्र दुपारपर्यंत खूपच कमी मतदान झाले. त्यातच कडक उन्हाचा परिणामही दुपारच्या सुमाराला मतदान केंद्रावर जाणवत होता. त्यामुळे तुरळक मतदार दिसत असल्याने मतदानाचा टक्का कमी झाला आहे. मात्र उन्हाचा पारा कमी झाला की, मतदार मतदान केंद्रावर रांगा लावतील असे एकंदरीत चित्र ग्रामीण परिसरात पाहवयास मिळणार आहे.