ठाणे - बोहल्यावर चढण्याआधी अनेक जण मतदानाच हक्क बजावतात. मात्र भिवंडी लोकसभा मतदारसंघातील बदलापूर येथे सावरे गावातील नवविवाहित दाम्पत्याने लग्न लागतच ढोल ताशांच्या गजरात वरात काढली. वरातीतून जातच त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.
भिवंडी लोकसभा : ढोल ताशांच्या गजरात नवरा-नवरीची वरात मतदान केंद्रावर
भोई सावरे गावात राहणारे वृषाली गाडे आणि शिवाजी यांच्या लग्नाची वरात थेट मतदानकेंद्रावर आली. या उभयतांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मतदान मतदानाचा हक्क बजावला.
ढोल ताशांच्या गजरात नवरा-नवरीची वरात मतदान केंद्रावर
भोई सावरे गावात राहणारे वृषाली गाडे आणि शिवाजी यांचा आज दुपारी १२ वाजता विवाह सोहळा आयोजित केला होता. या दोघांनी मतदान करण्याचा निश्चय लग्नाआधीच केला होता. त्यामुळे लग्न लागताच त्यांनी इतर विधी करण्याआधी वऱ्हाडी मंडळीसह ढोल ताशांच्या गजरात वाजत-गाजत मतदान केंद्रावर जावून मतदानाचा हक्क बजावला.