ठाणे - अतिथीगृहामध्ये एका खोलीमध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम अतिथीगृहामध्ये घडली. प्रतिमा प्रसाद (वय 20 रा. घाटकोपर, मुंबई) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर अरुण गुप्ता (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.
धक्कादायक! अतिथीगृहात प्रेयसीची हत्या करून प्रियकराने केली आत्महत्या - suicide
रेल्वे स्थानकासमोरील नीलम अतिथीगृहामध्ये प्रियकराने प्रेयसीची हत्या करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रतिमा प्रसाद (वय 20 राहणार घाटकोपर , मुंबई ) असे हत्या झालेल्या प्रेयसीचे नाव आहे. तर अरुण गुप्ता (वय 20) असे आत्महत्या करणाऱ्या प्रियकराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरुण गुप्ता हा मूळचा उत्तरप्रदेशमधील आजमगडचा रहिवासी आहे. त्याने काल रात्रीच्या सुमारास कल्याण रेल्वे स्थानकासमोरील नीलम अतिथीगृहामध्ये एक रूम बूक केली होती. काही वेळाने प्रतिमाही तिथे आली. रात्री नऊच्या सुमारास अरुणने गेस्ट हाउस मधील वेटरला चहा आणण्यासाठी सांगितले. त्यानंतर काही वेळाने वेटर चहा घेऊन गेला असता त्याने दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने वेटरने चावीच्या छिद्रातून खोलीच्या आतमध्ये डोकावले असता त्याला आतील पंख्याच्या छताला अरुणचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. तर तरुणीचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता.
गेस्ट हाऊसच्या मॅनेजरने या घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घतली. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुक्मिणीबाई रुग्णालयात रवाना करण्यात आले. अरुणने प्रतिमाचा गळा आवळून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःही गळफास घेतला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेचा तपास अद्यापही सुरू असून घटनेमागचे नेमके कारण अद्यापही समजले नसल्याचे सहायक पोलीस उपायुक्त अनिल पोवार यांनी सांगितले.