ठाणे -सहकाऱ्याला पत्र्याच्या खोलीत कोंडून ठेऊन ३ मजुरांनी सतत ४ दिवस अनैसर्गिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भिवंडी रेल्वे स्थानक परिसरात इमारत बांधकामासाठी ते मजूर आले होते. त्याच ठिकाणी असलेल्या चाळीत ही घटना घडली आहे.
सहकाऱ्याला खोलीत कोंडून चार दिवस अनैसर्गिक अत्याचार; ३ जणांविरोधात गुन्हा दाखल
अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग करून ते व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित केले आहे. या अत्याचाराबाबत पीडित तरुणाने वडिलांना माहिती दिली असता हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ३ मजुरांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
खळबळजनक बाब म्हणजे पीडित सहकाऱ्यावर सतत आळीपाळीने अनैसर्गिक अत्याचार केला आणि त्या अनैसर्गिक अत्याचाराचे व्हिडिओ शूटिंग करून ते व्हॉट्सअॅपद्वारे प्रसारित केले आहे. या अत्याचाराबाबत पीडित तरुणाने वडिलांना माहिती दिली असता हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात ३ मजुरांच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. भगवान, अजय आणि एक तपकिरी रंगाची ट्रॅक पँट घातलेला सहकारी तिघेही फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी नारपोली पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. यासंदर्भातील अधिक तपास पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव करीत आहे.