महाराष्ट्र

maharashtra

रस्त्यात मोबाईलवर बोलण्याच्या वादातून तरुणाची चाकूने भोसकून हत्या

By

Published : Sep 10, 2020, 4:59 PM IST

काल रात्री अनिकेत हा त्याचा मामा प्रविण वैराळ यांच्यासोबत मोटारसायकलवरून आपटेवाडी येथील टीव्हीएस शोरूम समोरून जात होता. त्यावेळी आरोपी ओमकार ऊर्फ बिल्ला हा रिक्षातून त्या ठिकाणी आला व तुम्ही रस्त्यावर मोटारसायकल उभी करून मोबाईलमध्ये का बोलत आहात, याबाबत विचारण केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात आरोपी ओमकारने त्याच्या जवळील धारदार चाकूने अनिकेत व प्रविण या दोघांना भोसकले.

Police and Criminal
पोलीस आणि आरोपी

ठाणे - रस्त्याच्याकडेला मोबाईलवर बोलत असताना दोघांवर चाकून हल्ला झाल्याची घटना बदलापूर पूर्व परिसरातील आपटे वाडी नाका येथे घडली. या घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी ओमकार उर्फ बिल्ला पवार (वय २४) याला अटक केली आहे. प्रविण वैराळ (वय ३३) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून अनिकेत शिंदे (वय २३) हा गंभीर जखमी झाला आहे.

बदलापूर येथील शिरगाव आपटेवाडी परिसरात अनिकेत शिंदे हा तरुण राहतो. काल रात्री अनिकेत हा त्याचा मामा प्रविण वैराळ यांच्यासोबत मोटारसायकलवरून आपटेवाडी येथील टीव्हीएस शोरूम समोरून जात होता. त्यावेळी अनिकेत याला त्याच्या मोबाईलवर फोन आल्याने त्याने मोटारसायक रस्त्याच्या कडेला उभी केली. अनिकेत हा मोबाईल फोनवर बोलत असताना त्याचा मामा प्रविण हा रस्त्याच्या कडेला उभा होता. त्यावेळी आरोपी ओमकार ऊर्फ बिल्ला हा रिक्षातून त्या ठिकाणी आला व तुम्ही रस्त्यावर मोटारसायल उभी करून मोबाईलमध्ये का बोलत आहात, याबाबत विचारण केली. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादात आरोपी ओमकारने त्याच्या जवळील धारदार चाकूने अनिकेत व प्रविण या दोघांना भोसकले. त्यात प्रविण वैराळ यांचा मृत्यू झाला तर अनिकेत हा गंभीर जखमी झाला. त्यानंतर ओमकार घटनास्थळावरून पळून गेला होता.

या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक बुराडे, कुलकर्णी, पोलीस नामदार कराळे, कदम, पोलीस शिपाई गायकवाड यांनी तपास करून आरोपी ओमकार उर्फ बिल्ला याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. आरोपी विरोधात बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात हत्येचा व जीवेठार मरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details