ठाणे - मोबाईलवर सतत पबजी गेम खेळतो म्हणून आई ओरडल्याने त्याचा मनात राग धरून एका कॉलेज युवकाने घर सोडून पलायन केल्याची घटना समोर आली आहे. ही घटनाशहरातील मानसरोवर येथील लेक व्ह्यूसोसायटीत घडली आहे. मयुर राजेंद्र गुळुंजकर ( १७) असे मुलाचे नाव आहे. तो बीएनएन महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिकत आहे.
परीक्षा तोंडावर आलेली असताना मयूर हा अभ्यास करायचे सोडून सततमोबाईलवरपबजी गेम खेळण्यात गुंतला होता. त्याचा परिणाम अभ्यासावर होत होता. त्यामुळे त्याचीआई निर्मला या त्याच्यावर रागावल्या. आईच्या रागवण्याचा मयूरला राग आला. तो रविवारी रोजच्या प्रमाणेभिवंडी रेल्वे स्थानक येथे मामे बहीणीला आणण्यासाठी मोटारसायकल घेऊन गेला होता. मात्र, मयुरने मोटारसायकल वमोबाईल व गाडीची चावीहँडलसमोरठेवून तोनिघून गेला.