महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक ! प्रियकराने प्रेयसीच्या आईची गळा चिरून केली हत्या, गुन्ह्यात प्रेयसीही सामील

प्रेमाच्या आड येणाऱ्या प्रेयसीच्या आईची हत्या केल्याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे. आईचा दोघांच्या प्रेमाला विरोध होता. यामुळे आईच्या हत्येचा कट प्रियकरासोबत पोटच्या मुलीनेच रचल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

thane murder
thane murder

By

Published : Mar 22, 2021, 8:36 PM IST

ठाणे - प्रियकराने अल्पवयीन प्रेयसीच्या आईचा धारदार हत्याराने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उल्हासनगर शहरातील कॅम्प नंबर ४ च्या २६ सेक्शन परिसरातील एका घरात शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला होता. धक्कादायक बाब म्हणजे प्रेयसीच्या आईने या दोघांच्या प्रेमाला विरोध करीत होती. यामुळे आईच्या हत्येचा कट प्रियकरासोबत पोटच्या मुलीनेच रचल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

प्रियकराने प्रेयसीच्या आईची गळा चिरून केली हत्या

पोलिसांनी रात्रभर शोध मोहीम राबवून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. दिलजित यादव असे हत्येप्रकरणी अटक केलेल्या प्रियकराचे नाव असून त्याच्यासह १५ वर्षीय अल्पवयीन मुलीलाही आईच्या हत्येत सहभागी असल्यामुळे ताब्यात घेतले आहे.

१५ वर्षीय अल्पवयीन मुलीनेच रचला आईच्या हत्येचा कट -

उल्हासनगर कॅम्प नंबर ४ च्या २६ सेक्शन परिसरात मृत विद्या तलरेजा (४०) राहत होती. तिच्या सोबतच त्यांची १५ वर्षीय अल्पवयीन मुलगीही राहत होती. त्यातच शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी मृत विद्याच्या घरात शिरून तिच्यावर तीक्ष्ण हत्याराने गळ्यावर सपासप वार करत गळा चिरून निर्घृण हत्या केली होती. हत्या झाली त्यावेळी कोणताही पुरावा मारेकरांनी ठेवला नव्हता. अशा वेळी वरीष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी तांत्रिक आधारावर विद्या हिच्या अल्पवयीन मुलीच्या तीन मित्रांना ताब्यात घेतल्यावर धक्कादायक प्रकार समोर आला. या तिघांपैकी जीन्स कारखान्यात काम करणाऱ्या आरोपी दिलजित यादव याच्याशी अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध होते. त्यास विद्या या विरोध करत होत्या. त्यामुळे मुलीने प्रियकराच्या मदतीने आईचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. मी कामाला जाणार त्याचे सीसीटीव्ही फुटेज असणार. आई घरी एकटीच असल्याने आपल्यामधील काट्याला संपवून टाक. अशी प्लॅनिंग केल्यावर आरोपी प्रियकराने ठरल्याप्रमाणे विद्या यांची राहत्या घरात निर्घृणपणे हत्या केली.

आरोपीला पोलीस कोठडी तर अल्पवयीन प्रेयसीची बालसुधारगृहात रवानगी -


वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैया थोरात, उपनिरीक्षक हर्षल राजपूत, गुन्हे प्रकटीकरणचे राहुल काळे, समीर गायकवाड, जितू चित्ते, शिपाई राठोड, चव्हाण, धुमाळ यांनी रात्रभर शोध मोहीम राबवून आरोपी दिलजित व अल्पवयीन मुलीला गजाआड केले आहे. दिलजित याला आज न्यायालयात हजर केले असता त्याला २७ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर अल्पवयीन प्रेयसीची भिवंडी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती उपनिरीक्षक हर्षल राजपूत यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details