ठाणे - शहरात पाश्चिमात्य संस्कृतीचा वाढता विळखा आणि त्यातून होणारे अपघात याला आळा बसावा यासाठी रक्तानंद ग्रुपच्या वतीने दरवर्षी रक्तदान शिबीर राबविले जाते. यंदा देखील ३१ डिसेंबरच्या रात्री वर्षाच्या पहिल्याच दिवशी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नवर्षाचे स्वागत रक्तदानाने; रक्तानंद ग्रुपचा उपक्रम
शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील रक्तदात्यांनी गर्दी केली होती. जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी मैदान येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा-'आरे' प्रकरणी वादग्रस्त अधिकारी अश्विनी भिडे यांची प्रधान सचिव पदी बढती
या शिबिराचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यातील रक्तदात्यांनी गर्दी केली होती. जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीने छत्रपती शिवाजी मैदान येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी या शिबिराला सुरुवात केली. यंदा शिबिराचे २४ वे वर्ष होते. यावेळी गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी या उपक्रमाचे स्वागत केले. तसेच मंत्री मंडळाच्या विस्ताराच्या बाबतीत विचारले असता, या बाबतीचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाआघाडीतील नेते घेतील असे त्यांनी सांगितले. तर नवीन वर्षात रखडलेल्या विकास कामाचा संकल्प लवकर मार्गी लावणार, असे शिंदे यांनी सांगितले. या रक्तदान शिबिराच्या दरम्यान सेनेचे खासदार शिंदे यांच्या सुपुत्रानेही रक्तदान केले. दरवर्षी या ठिकाणी अनेक लोक न चुकता रक्तदान करून नवीन वर्षाची सुरुवात करतात.