उल्हासनगरमधील कंपनीत ब्लास्ट ठाणे : Blast at Century Company : उल्हासनगर शहाड परिसरात सेंच्युरी कंपनी आहे. या कंपनीमधील सीएस2 या डिपार्टमेंटमध्ये आज (23 सप्टेंबर) सकाळी जोरदार ब्लास्ट झाला. या घटनेत सहा कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत (Company Blast Thane) आहे. या जखमी कामगारांना सेंच्युरी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हा ब्लास्ट कशामुळं झाला, याची माहिती अद्याप मिळालेली (Century Company Blast) नाही.
भीषण स्फोट :घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. एकंदरीतच या दुर्घटनेत आतापर्यंत पाचजण दगावल्याची शक्यता वर्तविली जातेय. मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. उल्हानगर शहरात सेच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीच्या सीएस2 डिपार्टमेंटमध्ये शनिवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास अचानक भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता, की शहरातील तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर, परिसरातील घरांना हादरे बसले. या भीषण स्फोटात आतापर्यंत 4 कामगार बेपत्ता आहेत. तसंच टँकरचा चालकही सापडलेला नाही. या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची भीती आहे.
गणेशोत्सवात कामगारांवर काळाचा घाला :यात शैलेश राजकरन यादव (वय 26), राजेश श्रीवास्तव, (वय 46) अनंता डिगांरे (वय 50) आणि अनंत जाधव या कर्मचाऱ्यांचा पत्ता लागलेला नाही. तसंच सागर झाल्टे, पंडित मोरे, प्रकाश निकम, हंसराज सरोज, अमित भरनुके, मोहम्मद अरमान असे सहा कामगार गंभीर जखमी आहेत. तर घटनास्थळी असलेला पवन यादव हा टँकर चालक अद्याप बेपत्ता आहे. ऐन गणेशोत्सवात कामगारांवर काळानं घाला घातल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त होतेय.
कंपनीत गॅसचा टँकर :या घटनेची मिळताच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार कुमार आयलानी, पप्पू कलानी, ठाकरे गटाचे धनंजय बोडारे, शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी, अरुण आशान, विकी भुल्लर यांच्यासह इतर नेत्यांनी घटनास्थळी भेट दिलीय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नायट्रोजन गॅसचा टँकर सेंच्युरी कंपनीत आणण्यात आला होता. त्यात सीएस2 (कार्बनडाय सल्फर) भरणार होते. त्याची चेकिंग सुरू असताना हा स्फोट झालाय. या दुर्घटनेत आतापर्यत चारजण दगावले असून एकजण बेपत्ता आहे, अशी माहिती पोलीस अधिकारी दिलीप फुलपगारे यांनी दिलीय. घटनास्थळी योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच उपसंचालक औद्योगिक सुरक्षा विभाग हे सदर घटनेची चौकशी करीत असल्याचंही सांगितलंय.
टँकरची तपासणी सुरू असतानाच स्फोट : सेंच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11. 30 वाजताच्या सुमारास कंपनीमध्ये एमएच 04 जिसी 2482 हा टँकर बाहेरून आला होता. त्यात सीएस2 (कार्बन डाय सल्फर) हे रसायन भरण्यात येणार होतं. मात्र, टँकरची तपासणी सुरू असतानाच हा स्फोट झालाय. यात दोन जण दगावले आहेत. तर जखमींना सेंच्युरी रेयॉनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांची प्रकृती स्थिर आहे. कंपनीनं सुरक्षिततेच्या दृष्टीनं सर्व सुरक्षा यंत्रणा आणि उपाययोजना लागू केल्या आहेत.
हेही वाचा -
- Satara Gelatin Blast : जिलेटीन स्फोटाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा बफर झोन हादरला, जिलेटीनच्या 115 कांड्या जप्त
- Cylinder Explosion : धक्कादायक! सिलिंडरच्या स्फोटात एका कुटुंबातील 6 जणांचा होरपळून मृत्यू
- Bomb Blast Planning : देशातील अनेक ठिकाणी बॉम्बस्फोटाचा होता कट; पुण्यातील दहशतवाद्यांच्या चौकशीत मोठे खुलासे