ठाणे- "मै भी चौकीदार" या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओ कॉन्फ्ररंसचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला भाजपच्या निम्याहून अधिक नगरसेवकांनी पाठ फिरवली. 23 पैकी केवळ १० नगरसेवकांनीच या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने मोदींची 'चौकीदार मोहीम' स्वपक्षातच फोल ठरली आहे.
ठाण्यात 'मे भी चौकीदार' कार्यक्रमाचा फज्जा, भाजप नगरसेवक गैरहजर - bjp
भाजपच्या 23 पैकी १० नगरसेवकांनीच या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर,१३ नागरसेवकांनी मोदींच्या या व्हिडीओ कॉन्फरन्सकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.
तर दुसरीकडे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांच्यासह आमदार प्रताप सरनाईक आणि सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी उपस्थित राहून महायुतीचा धर्म पाळला. परंतू रिपाईच्या आठवले गटानेही या मोहिमेकडे पाठ फिरवल्याने महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा सध्या सुरु आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर संपूर्ण देशात भाजपच्या वतीने "में भी चौकीदार" या कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी विडिओ कॉन्फरन्सद्वारे नागरिकांशी संवाद साधला. ठाण्यातील ज्ञानराज सभागृह येथे मोदी यांचे विचार ऐकण्यासाठी ठाणे भाजपच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .मात्र, भाजपच्या 23 पैकी १० नगरसेवकांनीच या कार्यक्रमाला हजेरी लावली. तर,१३ नागरसेवकांनी मोदींच्या या व्हिडीओ कॉन्फरन्सकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या नाराज नागरीकांची नाराजी दूर केली जाईल असे मत राजन विचारे यांनी स्पष्ट केले.