ठाणे - भारतीय जनता पक्ष उद्या दाभोलकर, पानसरे, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी देईल. अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी कल्याण येथे केली. भिवंडी लोकसभेचे काँग्रेस आघाडीचे उमेदवार सुरेश टावरे यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
साध्वी प्रज्ञा सिंग यांनी हुतात्मा हेमंत करकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजप सरकार आणि मोदींवर हल्लाबोल केला. प्रज्ञा ठाकूर यांच्या अनुभवावरून येणाऱ्या काळात भाजप सरकार दाभोलकर ,गोविंद पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांनाही उमेदवारी देईल. असे झाल्यास आश्चर्य वाटायला नको, असे ते म्हणाले.