नवी मुंबई -१७ मार्चला १९७० सिडकोची स्थापना झाली होती, सिडकोच्या स्थापनेनंतर ५१ वर्ष सिडकोने नवी मुंबई, पनवेल उरणमधील अनेक भूमिपुत्रांची फसवणूक केली आहे, असा आरोप भूमिपुत्रांनी केला असून १७ मार्चला सिडकोच्या विरोधात काळा दिवस साजरा करणार असून या संदर्भात आमदार गणेश नाईक यांनी सिडकोने आता येथून निघून जावे, त्यामुळे सिडको हटाव ही भूमिपुत्रांची भूमिकादेखील रास्त असल्याचे नाईक यांनी म्हटले आहे.
'एक दिवस काळा असू शकत नाही'
सिडकोच्या विरुद्ध एक दिवस काळा असू शकत नाही. जोपर्यंत सिडको येथे राहील, तोपर्यंत सर्वच दिवस हे काळे असतील, असेही वक्तव्य नाईक यांनी केले आहे.
'सिडकोचे काम संपलेले आहे'
नवी मुंबई हे नियोजित शहर सिडकोच्या माध्यमातून वसवले गेले. मात्र शहरे वसवताना सिडकोने भूमिपुत्रांची प्रचंड फसवणूक केली आहे. त्यामुळे सिडकोने येथून निघून जावे, असे मत नाईक यांनी व्यक्त केले आहे. सर्व कारभार महापालिका व प्रकल्पग्रस्तांच्या हाती सोपवावा, असेही त्यांनी म्हटले. कित्त्येक वर्षांपासून सिडकोच्या माध्यमातून अन्याय होत आहे. त्यामुळे एक दिवस काळा दिवस होऊ शकत नाही, असेही नाईक यांनी म्हटले आहे.