महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मतदान केंद्रात 'लाज कशी वाटत नाही'ची जाहिरात पाहून भाजप पदाधिकारी भडकला

भाजप सरकारवर टीका करण्यासाठी आघाडीने 'लाज कशी वाटत नाही' या मथळ्याखाली जाहिरात दिली होती. तसेच, 'हे सरकार फेल आहे' अशा आशयाच्या जाहिराती दिल्या होत्या. याच जाहिराती असलेली वर्तमानपत्राची कात्रणे कर्मचाऱ्यांकडून टेबलवर लावण्यात आली. त्यामुळे भाजप शहराध्यक्षाचा पारा चढला आणि त्याने कर्मचाऱ्यांना सुनावले.

भाजपचे प्रज्ञेश प्रभुघाटे कर्मचाऱ्याशी वाद घालताना

By

Published : Apr 30, 2019, 3:24 PM IST

ठाणे - भाजपच्या शहराध्यक्षाने मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातल्याचा व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. हा वाद मतदान केंद्रातील टेबलवर लावलेल्या वर्तमानपत्रामुळे झाल्याचे समोर आले आहे. टेबल खराब असल्याने केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी वर्तमानपत्रांनी झाकला होता. पण, त्या वर्तमानपत्रावर काँग्रेस आघाडीने भाजप सरकारविरोधात दिलेल्या जाहिराती होत्या.

भाजपचे प्रज्ञेश प्रभुघाटे कर्मचाऱ्याशी वाद घालताना

भाजप सरकारवर टीका करण्यासाठी आघाडीने 'लाज कशी वाटत नाही' या मथळ्याखाली जाहिरात दिली होती. तसेच, 'हे सरकार फेल आहे' अशा आशयाच्या जाहिराती दिल्या होत्या. याच जाहिराती असलेली वर्तमानपत्राची कात्रणे कर्मचाऱ्यांकडून टेबलवर लावण्यात आली. त्यामुळे भाजप शहराध्यक्षाचा पारा चढला आणि त्याने कर्मचाऱ्यांना सुनावले.

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार खासदार श्रीकांत शिंदे आणि आघाडीचे उमेदवार बाबाजी पाटील यांच्यात अटीतटीचा सामना आहे. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा गांधी शाळा बूथ क्रमांक १८७ मध्ये मतदान केंद्रातील टेबलवरदर्शनी भागात ‘लाज कशी वाटत नाही’ या काँग्रेसची जाहिरात असलेले वर्तमानपत्र लावण्याचा प्रकार आढळून आला. भाजप पदाधिकारी प्रज्ञेश प्रभुघाटे यांनी कर्मचाऱ्यांना याप्रकरणी जाब विचारला. मात्र, त्यांनी योग्य उत्तर दिले नसल्याने मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांविरोधात झोनल अधिकारी शैलेश मळेकर यांच्याकडे प्रभुघाटे यांनी लेखी तक्रार केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details