महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Nana Patole Criticism BJP: सोशल मीडियाच्या माध्यमांतून जातीय दंगली घडविण्याचा भाजपचा डाव- नाना पटोले

राज्यात सोशल मीडियाच्या माध्यमांतून दोन समाजात जातीय दंगली घडविण्याचा डाव भाजपचे नेते करीत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज (शुक्रवारी) ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये केला.

Nana Patole Criticism BJP
नाना पटोले

By

Published : May 26, 2023, 10:44 PM IST

दंगलीच्या राजकारणावरून नाना पटोलेंची भाजपवर टीका

ठाणे:सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टला कमेंट करणाऱ्या अल्पवयीन मुलाला एका गटाच्या जमावाने अर्धनग्न करून बेदम मारहाण करत धिंड काढली होती. ही घटना कल्याणमध्ये घडली होती. या प्रकरणानंतर नाना पटोले यांनी त्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाच्या घरी भेट देत त्याची विचारपूस केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर गंभीर आरोप केले.

पोलिसांवर सरकारचा दबाव आहे का?पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात धार्मिक आणि जातीय दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप केला. औरंगाबाद, अकोला, नगर जिल्ह्यातील शेवगाव, त्रंबकेश्वरमध्ये अशा घटना घडल्या आणि आता कल्याणमध्ये अल्पवयीन मुलाला मारहाण करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या अकाउंटमधून ज्या पद्धतीने जातीय तेढ निर्माण केली जातेय, त्याबाबत पोलिसांचा आयटी विभाग, आयबी विभाग काय करतोय? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? हा पण एक प्रश्न निर्माण होतो.

सरकारला उत्तर द्यावे लागेल:सरकार महाराष्ट्रात जातीय तेढ निर्माण करण्याचा काम करत असेल, तर त्या पद्धतीची भूमिका तुम्ही स्पष्ट मांडली पाहिजे. तुम्ही कायद्याचे रक्षक आहात आपण जनतेचे सेवक आहात अशी भूमिका आपण ठेवली पाहिजे. अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याप्रकरणी कुठलेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे या प्रकरणात दाखल केलेले नाही. पोलिसांवर सरकारचा दबाव आहे का? असा प्रश्न आता निर्माण होतोय. याचा जाब सरकारला विचारू. सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. महाराष्ट्रात या पद्धतीच्या घटना ठरवून घडत असतील तर या सरकारला जनता माफ करणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

कसा घडला होता प्रकार?:काही दिवसांपूर्वी लोणावळा येथील कार्ले डोंगरावरील एकविरा देवी विषयी आक्षेपार्ह पोस्ट वायरल झाली होती. त्याच पोस्टला कल्याण येथील एका तरुणाने कमेंट केली होती. कमेंट करणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाचा शोध घेऊन एका गटाच्या जमावाने त्या तरुणाला बेदम मारहाण केली. यानंतर कल्याणच्या बारावे येथील एकविरा देवीच्या मंदिरात नेऊन देवीच्या समोर नाक घासायला लावले. तर अर्धनग्न अवस्थेत त्याची धिंड काढण्यात आली. या गंभीर प्रकरणाची कल्याण खडकपाडा पोलिसांनी दखल घेऊन २५ ते ३० जणांच्या जमावावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आतापर्यंत १६ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

हेही वाचा:

  1. CM Eknath Shinde: कोणी किती आले तरी मोदी एकटेच पुरेसे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टिका
  2. Prithviraj Chavan On Modi: पंतप्रधान मोदींची देशभरातून जादू घटली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे भाजपवर टीकास्त्र
  3. Ashish Shelar Criticized MVA : हे तर उष्ट्या पत्रावळीवरचे कावळे; आशिष शेलार यांचे सामनातील अग्रलेखाला उत्तर

ABOUT THE AUTHOR

...view details