ठाणे - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे भिवंडी रोड स्टेशन सर्वात यशस्वी हे व्यवसाय विकास युनिट म्हणून उदयास आले आहे. सप्टेंबर - 2020 ते जुलै - 2021 पर्यंत भिवंडी रोड स्टेशनवरुन 18 हजार 867 टन वजनाचे एकूण 13 लाख 37 हजार पॅकेजेस पाठवण्यात आले आहेत. हे पार्स शालिमार, आजरा (गुवाहाटी), पाटणा व इतर ठिकाणी पाठवले आहेत. यामुळे अलीकडच्या काळात भिवंडी रोड रेल्वे स्थानक 'बिझनेस डेव्हलपमेंट युनिट' महत्त्वाची भूमिका बजावत असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
मध्य रेल्वेला 10.80 कोटींचे उत्पन्न
सप्टेंबर - 2020 ते जुलै - 2021 पर्यंत भिवंडी रोड स्टेशनवरुन 18 हजार 867 टन वजनाचे एकूण 13 लाख 37 हजार पॅकेजेस पाठवण्यात आले आहेत. ज्यात फर्निचर, रेफ्रिजरेटर, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खाद्यपदार्थ, खाद्यान्न, औषधे, प्लास्टिकच्या वस्तू, पिशव्या, स्टेशनरी, वंगण लोकप्रिय ब्रँडचे तेल आणि सौंदर्यप्रसाधने यांचा समावेश आहे. सर्वात जास्त शालिमार येथे 8 हजार 730.68 टन पार्सल पाठविण्यात आले आहे. त्यानंतर 8 हजार 72.46 टन पार्सल आजरा (गुवाहाटी) आणि 1 हजार 635 टन पार्सल दानापूर (पाटणा) यातून मध्य रेल्वेला 10.80 कोटींचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.