ठाणे- भिवंडी शहर महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातील लिपिक भीमराव पुंडलिक सकपाळे (वय ५९) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कामावर असताना ही घटना घडली आहे. या घटनेने कामगार वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.
भिवंडी पालिका कर्मचाऱ्याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन - भीमराव सकपाळे मृत्यू बातमी ठाणे
भीमराव सकपाळे अन्य कामगारांसह सकाळी चावींद्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर कामकाजाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला.
हेही वाचा-तपास अधिकारी बदला; कॉ. पानसरेंच्या कुटुंबीयांची न्यायालयात मागणी
भीमराव सकपाळे अन्य कामगारांसह सकाळी चावींद्रा येथील डम्पिंग ग्राऊंडवर कामकाजाची पाहणी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याने ते बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळले. त्यावेळी सोबत असलेले सहकारी कर्मचारी संजय जाधव व संजय केदार यांनी त्यांना उपचारासाठी तात्काळ प्रथम सिराज हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र, उपचार सुरु असतानाच त्यांचे निधन झाले. सायंकाळी त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात टेमघर येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील मान्यवर नागरिकांसह कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.