ठाणे- लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता सुरू झाली आहे. या बरोबर एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या आयाराम गयारामांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भिवंडी मतदारसंघातून काँग्रेसने अद्याप उमेदवार निश्चित केला नाही. या जागेसाठी शिवसेनेचा एक मोठा नेता काँग्रेसकडून इच्छुक असल्याची चर्चा झडत आहे. त्या पार्श्वभूमीवर भिवंडी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारीला विरोध दर्शवला आहे.
भिवंडी मतदार संघासाठी काँग्रेसकडून ६ पदाधिकारी उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. माजी खासदार सुरेश टावरे, माजी आमदार योगेश पाटील, विश्वनाथ पाटील, राकेश पाटील, छगन पाटील, निलेश सांबरे, आर. सी. पाटील यांची नावे चर्चेत आहेत. ही नावे जिल्हा काँग्रेस समितीकडून केंद्रीय निवडणूक समितीला पाठवण्यात आली आहेत. यावर निर्णय येण्याचे बाकी आहे.