ठाणे:जिल्ह्यातील उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. देशातील मध्य प्रदेश येथील छतरपूर जिल्हा भागातील बागेश्वर धाम ही संतांची भूमी म्हणून नावरूपास आली आहे. सध्याचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री मागील आठ वर्षांपासून येथे येणाऱ्या सहस्त्र भाविकांशी संवाद साधतात. आठवड्यातून मंगळवारी आणि शनिवारी लाखो भाविक बागेश्वर धाममध्ये दर्शनासाठी गर्दी करतात.
भूमिपूजन सोहळा संपन्न: यापूर्वी ६ आणि ७ नोव्हेंबर रोजी बागेश्वर बाबाकडून भिवंडीत दिव्य बालाजी दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी प्रसिद्ध उद्योगपती रुद्र प्रताप त्रिपाठी यांनी इंडियन कॉर्पोरेशन माईल स्टोन येथे बागेश्वर धाम मंदिर आणि आश्रम उभारण्याचा संकल्प केला होता. याआधारे आज सोमवारी येथे भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. भिवंडी तालुक्यात बागेश्वर धाम बालाजी मंदिर आणि आश्रम भूमिपूजन सोहळा बालाजी सरकार धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या हस्ते अंजुरदिवे येथील गोदाम पट्ट्यात असलेल्या इंडियन कॉर्पोरेशन येथे पार पडला. यावेळी आमदार रवी राणा आणि खासदार मनोज तिवारी देखील उपस्थित होते.