ठाणे :डोंबिवली पश्चिमेकडील नवापाडा परिसरात काल पाहाटेच्या सुमारास दोन ज्वेलर्सच्या दुकानात चोरट्यांनी चोरी करत सोने,चांदी असे मिळून तब्बल 13 लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी विष्णू नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला होता. आज पहाटेच्या सुमारास डोंबिवली पूर्वेत श्रीखंडेवाडी परिसरातील शांतीलाल कुंदनलाल सोनी यांचे राजलक्ष्मी ज्वेलर्स नावाने दागिने विक्रीचे दुकान आहे. आज पहाटेच्या सुमारास या ज्वेलर्स दुकानाला लागून असलेल्या दोन्ही दुकानांच्या भिंती फोडून चोरटयांनी राजलक्ष्मी ज्वेलर्सच्या दुकानाची भिंत देखील फोडण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या दिवशीही चोरीचा प्रयत्न :चोरीचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने दोन्ही चोरट्याने तिथून काढता पाय घेतला. हे दोन्ही चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. याप्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या चोरट्यांचा शोध सुरू केला आहे. सलग दुसऱ्या दिवशी चोरट्यांनी ज्वेलर्स दुकानांना लक्ष केल्याने डोंबिवलीतील ज्वेलर्स दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या वर्षी दावडी भागात एका जवाहिऱ्यावर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आला होता. डोंबिवलीतील वाढत्या भुरट्या, घरफोड्यांमुळे नागरिक, व्यापारी हैराण आहेत.