ठाणे -दारू पिण्यासाठी २०० रूपये दिले नाही म्हणून संतापलेल्या मुलाने स्वत:च्या आईला मारहाण करून दोरीने गळा आवळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगर शहर - कॅम्प ४ येथील संतोषनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी आरोपी सुमीत पाटील (वय ३१) याला अटक केली आहे.
प्रेमलता पाटील या घरकाम करून उपजीविका भागवतात. शुक्रवार (22 नोव्हेंबर) रात्री दीडच्या सुमारास त्यांचा मुलगा सुमीत घरी आला. त्याने आईला दारू पिण्यासाठी २०० रूपये मागितले. प्रेमलता यांनी नकार दिल्यानंतर रागाच्या भरात त्याने प्रेमलता यांच्या डाव्या डोळयावर जोरात फटका मारून दोरीने त्यांचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. प्रेमलता यांनी आरडाओरड केल्यावर शेजारी राहणाऱ्या महिलेने त्यांच्या घरात धाव घेऊन आरोपीच्या तावडीतून त्यांची सुटका केली.