ठाणे -महिला घरात एकटीच असल्याचा फायदा घेत, शेजारी राहणारा आरोपी महिलेच्या घरात बळजबरीने घुसून तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. याप्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. राजेश (४०) असे आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा... सुलेमानींच्या अंत्ययात्रेत चेंगराचेंगरी; तब्बल ३५ जणांचा मृत्यू, ४८ गंभीर जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत ३९ वर्षीय महिला कुटंबासह राहते. शेजारी राहणारा आरोपी राजेश याची पीडितेवर वाईट नजर होती. त्यात सायंकाळच्या सुमारास पीडित महिला घरात एकटी असल्याचा फायदा घेत, तो बळजबरीने तिच्या घरात शिरला. त्याने तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. त्यामुळे पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केल्याप्रकरणी त्या पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून उल्हासनगर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच आरोपी राजेश याला अटक करण्यात आली आहे. अधिकचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन शिंदे करत आहेत.
हेही वाचा.. ''असहिष्णुतेच्या मुद्द्यावर योग्य होते आमिर आणि शाहरुख''