ठाणे - मुरबाड तालुक्यातील ६७ वर्षाच्या वयोवृद्ध शेतकऱ्याने ४ वर्षापूर्वी मुरबाड तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आता या प्रकरणी राज्य मानवी हक्क आयोगाच्या आदेशानुसार मुरबाड कार्यालयातील तत्कालीन अधिकारी, कर्मचारी व मृत वृद्धाच्या एका नातेवाईकावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊन पंधरा दिवस उलटूनही अद्यापही आरोपींना अटक करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे मृत शेतकऱ्याच्या मुलाने पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. तत्कालीन तहसीलदार सर्जेराव म्हस्के-पाटील, नायब तहसीलदार अजय पाटील आणि कर्मचारी नितीन घाणेकर असे गुन्हा दाखल झालेल्या तत्कालीन अधिकारी-कर्मचाऱ्याची नावे आहेत. तर अशोक शंकर देसले (६७ वर्षे) असे तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
न्यायासाठी वर्षभर तहसील कार्यलयात हेलपाटे
मुरबाड तालुक्यातील शेलगाव येथील मृत शेतकरी अशोक शंकर देसले यांची शेतजमीन त्यांचे चुलत भाऊ नामदेव देसले यांनी खोटी कागदपत्रे तयार करून ४ वर्षांपूर्वी हडप केली होती. त्यामुळे आपली शेतजमीन परत मिळावी यासाठी अशोक देसलेंनी २०१६ साली मुरबाड तहसील कार्यालयात अर्ज दाखल केला होता. त्यानंतर वर्षभर तहसील कार्यालयाच्या पायऱ्याही झिझवल्या. मात्र, वर्षभर न्यायासाठी हेलपाटे मारूनही न्याय मिळाला नाही. त्यामुळे अखेर कंटाळून १० मे २०१७ रोजी अशोक देसले यांनी तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.
'...तर माझ्या वडिलांवर आत्महत्येची वेळ आली नसती'