नवी मुंबई- आम्ही एका विचाराने महाआघाडीचे सरकार स्थापन केले आहे. आम्ही पाडापाडी करायला एकत्र आलो नाही. कोणाचाही बाप काढायचा अधिकार कोणालाही नाही. कोणाचा बाप काढायचे काम कधीही कॉंग्रेसने केले नाही. ती आमची संस्कृती नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केले. ते नवी मुंबईत आयोजित महाआघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
महाआघाडीच्या कार्यकर्ते व पदाधिकारी मेळाव्यात बोलताना अशोक चव्हाण हेही वाचा-विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणवरून उच्च शिक्षणमंत्र्यांनी कुलगुरुंना झापले !
महाआघाडीचे सरकार आम्ही एका विचाराने स्थापन केले आहे. हे सरकार चालले पाहिजे, ही आमची इच्छा आहे. आम्ही पाडापाडी करायला एकत्र आलो नाही. शिवसेनाप्रमुखांनी निर्णय घेतला आणि सत्तेत परिवर्तन घडले. जे महाराष्ट्राच्या राजकारणात घडले तेच नवी मुंबईत घडेल, असेही चव्हाण म्हणाले.
भाजपला अजूनही सत्तेची स्वप्ने पडत आहेत. पण त्यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. नवी मुंबईला चांगला पालकमंत्री मिळाला आहे. त्यामुळे नवी मुंबईकरांनी संधीचे सोनं करावे. तसेच दादांनीही विकासासाठी तिजोरीच्या चाव्या मोकळ्या कराव्यात, असा मिश्कील टोलाही त्यांनी लगावला. नवी मुंबई हे शहर मुंबईच्या बरोबरीने प्रगती करणारे शहर आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष पुरवावे. देशात बुलेट ट्रेनची गरज नाही. लोकल ट्रेन चांगली करावी, असे चव्हाण म्हणाले.