महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महागाई विरोधात अण्णा हजारे यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज - नाना पटोले - ठाणे काँग्रेस बातमी

महागाईच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हाजारे यांनी रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

नाना पटोले
नाना पटोले

By

Published : Jul 31, 2021, 9:42 PM IST

Updated : Jul 31, 2021, 10:14 PM IST

ठाणे - केंद्र सरकारने गेल्या काही वर्षापासून इंधनासह जीवनाश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमतीविरोधात अण्णा हजारे यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची गरज आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भिवंडीत व्यक्त केले.

बोलताना नाना पटोले

नाना पटोले आज (दि. 31 जुलै) भिवंडीतील सोनाळे गाव हद्दीत ठाणे जिल्हा ग्रामीण माजी अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या निवासस्थानासमोरील पटांगणात केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहिमेचा छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना केंद्र सरकारने केलेल्या दरवाढ आणि भ्रष्टाचाराबाबत पुन्हा रस्त्यावर उतरण्याची हाक दिली आहे.

शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपये उद्योगपतीच्या घशात

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. केंद्रातील सरकारने शेतकऱ्याच्या कोट्यवधी रुपयांवर डल्ला मारून या कोट्यवधी रुपयांतून उद्योगपती विजय मल्ल्या, निरव मोदी, ललित मोदी यांच्यासारख्या उद्योगपतीचे कर्ज माफ केले. मात्र, शेतकरी आजही कर्जाच्या बोजाखाली अडकून पडला असून या मोदी सरकारला जाग आणण्यासाठीच आम्ही महाराष्ट्रभर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात यशस्वी ठरलो आहे. आतापर्यंत एक कोटीच्यावर नागरिकांनी केंद्र सरकारच्या महागाईविरोधात तसेच इंधन दरवाढीविरोधात रोष व्यक्त केल्याचीही यावेळी नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा -...म्हणून भाजपा-मनसे युतीची पतंग उडवण्यात अर्थ नाही - विनोद तावडे

Last Updated : Jul 31, 2021, 10:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details