ठाणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांचा Why I Killed Gandhi हा चित्रपट 30 जानेवारीला प्रदर्शित होत ( Amol Kolhe New Movie ) आहे. त्याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला. मात्र, हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादात सापडला आहे. कारण या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसेची भूमिका साकारली आहे. यावरुन आता संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कलाकारांचा वेष घेऊन गांधी हत्येचं समर्थन करू शकत नाही. सिनेमाला विरोध करणारच, अशी आक्रमक भूमिका त्यांनी ( Jitendra Awvhad On Amol Kolhe Movie ) घेतली आहे.
अमोल कोल्हे या चित्रपटाच्या प्रोमोत ‘मी गांधीजींचा वध केला’, असे बोलताना दिसत आहे. या चित्रपटाबाबात बोलताना जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad On Why I Killed Gandhi ) म्हणाले की, "गेले 20 ते 25 वर्षे गांधी विरोधाच्या चित्रपटांना मी विरोध केला. तो एक वैचारिक विरोध आहे. खासदारांनी ही भूमिका स्वीकारली हेच चुकीचे आहे. कलाकाराने समाजाच्या बाजूने उभे राहिले पाहिजे. तसेच, गांधींचा खून करणाऱ्या नथुरामची भूमिका स्वीकारण्यावर माझा विरोध आहे. कुठलाही कलाकार एखादी भूमिका करतो तेव्हा ती भूमिका अंगात उतरवत असतो. भूमिका आणि माणूस हे वेगळं असू शकत नाही. त्यामुळे वर्ष कोणतेही असो विरोध हा विरोध असणारच," असा पवित्रा आव्हाड यांनी घेतला आहे.