महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अंबरनाथ बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात; नगरपरिषद प्रशासन झोपेत - वाहनचालक

वाहनचालकांना चिखलातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. तसेच अनेक दुचाकी खड्डेमय तलावात फसतात. त्यामुळे त्यांचे वाहन बंद होत असल्याने वाहन खेचून त्यांना पायपीट करावी लागत आहे.

अंबरनाथ बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात

By

Published : Jul 20, 2019, 7:31 PM IST

ठाणे- पावसाने अंबरनाथ पूर्व भागातील पहिलावहिला बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात बुडाला आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्या चिखलातून वाहने काढणे देखील जिकरीचे झाले आहे. मात्र, या रस्त्याकडे नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप रस्त्यावरून ये-जा करणारे वाहनचालक करीत आहेत.

अंबरनाथ बाह्यवळण रस्ता गुडघाभर चिखलात

अंबरनाथ पूर्वेकडील स्वामी समर्थ चौक ते एमआयडीसी रस्त्याला जोणारा बाह्यवळण रस्ता आहे. विशेष म्हणजे वडवली, शिवाजीनगर आणि औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियोजन म्हणून हा बाह्य रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र, या रस्त्यावर अंबरनाथ पालिकेने फक्त मातीचा भराव टाकून रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत सोडले आहे. त्यामुळे पावसामुळे हा रस्ता गुडघाभर चिखलात बुडाला आहे.

वाहनचालकांना चिखलातून वाहन काढताना मोठी कसरत करावी लागते. तसेच अनेक दुचाकी खड्डेमय तलावात फसतात. त्यामुळे त्यांचे वाहन बंद होत असल्याने वाहन खेचून त्यांना पायपीट करावी लागत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष दिली नाहीतर, मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ABOUT THE AUTHOR

...view details