ठाणे -कोरोनाच्या भस्मासुराने संपूर्ण जगाला आपल्या ताब्यात घेतले असून शेकडो देश त्यातून बाहेर पाडण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, या रोगाला घाबरून न जाता त्यावर कशी मात करता येईल याचा आदर्श ठाण्यातील निहाटकर कुटुंबाने घालून दिला आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या पूनम निहाटकर आणि त्यांच्या मुली गेल्या आठवड्यातच परदेशातून आल्या होत्या. इथे येताच त्यांनी स्वतःच्या कुटुंबाला स्वेच्छेने होम क्वारेंटाईन अर्थात विलगीकरण करून घेतले.
देशसेवा करण्याची उत्तम संधी, ठाण्यातील कुटुंब स्वखुशीने झाले क्वारेंटाईन - कोरोनाव्हायरस उपचार
कोरोनाच्या भस्मासुराने संपूर्ण जगाला आपल्या ताब्यात घेतले असून या रोगाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी शेकडो देश प्रयत्न करत आहे. यातच ठाण्यातील एका कुटुंबाने परदेशातून आल्यानंतर स्वखुशीने होम क्वारेंटाईन करून घेतले.
डॉ. निहाटकर यांनी आपल्या सोसायटीला एक निवेदन दिले ज्यात आपण खबरदारीचा उपाय म्हणून होम क्वारेंटाईन होत असल्याचे कळविले. त्यांच्या सोसायटीने देखील याची दखल घेत त्यांना संपूर्ण सहकार्य करत जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता केली असे त्या अभिमानाने सांगतात. आपल्याला देशसेवा करण्याची संधी मिळत नाही. मात्र, या रोगाचा प्रसार थोपवण्यात मदत केली तर ही एक प्रकारची देशसेवाच असून प्रत्येक नागरिकाने जागरूकता दाखवून या संधीचा लाभ घ्यावा, असा अभिनव विचार त्यांनी मांडला आहे.