महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी - ठाणे न्यायालय बातमी

दिवा शहरातील माथार्डी गावा चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी नराधमास अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

आरोपी
आरोपी

By

Published : Jan 11, 2021, 8:16 PM IST

Updated : Jan 11, 2021, 8:33 PM IST

ठाणे -दिवा शहरातील माथार्डी गावात चार वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केल्याची घटना 8 जानेवारीला घडली होती. या प्रकरणी आरोपी पांडुरंग शेलार यांच्या विरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला असून आरोपीस अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपी शेलार याला न्यायालयात हजर असता त्याला 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.

8 जानेवारीला चिमुरडी ही घराच्या समोर खेळत होती. खेळता-खेळता शेजारीच राहणाऱ्या आरोपीच्या घरी चिमुरडी गेल्यानंतर नराधम आरोपी पांडुरंग शेलार याने चिमुरडीसोबत कुकर्म केले. चिमुरडीची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर आरोपी पांडुरंग शेलार याने कुटुंबियांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या दिल्या. धमकीला घाबरत पीडितेच्या कुटुंबियांनी तक्रार दिली नाही. मात्र, दिव्यातील सुज्ञ नागरिकाने चिमुरडीवर अत्याचार झाल्याची माहिती 100 नंबरवर दिली. त्यानंतर 9 जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. 100 नंबरवर पोलिसांना कळविल्याने मुंब्रा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत 9 जानेवारीला मुंब्रा पोलीस ठाण्यात अत्याचार, बाललैंगिक प्रतिबंध कायदा 2012 पॉक्सो नुसार गुन्हा दाखल करत आरोपी पांडुरंग शेलार यास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने नराधमाला 16 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे कधी होणार, नागरिकांचा सवाल

दिवा शहरात 5 लाखाहून जास्त लोकसंख्या आहे. त्यांचे रक्षण करण्यासाठी 20 ते 22 पोलीस आहेत. ते दिवस-रात्र दिवा शहरातील गुन्हेगारी संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण, दिवा शहरात पोलीस ठाणे होत नाही तोपर्यंत ही गुन्हेगारी थांबणार नाही, असे म्हणत शहरात पोलीस ठाणे कधी होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

हेही वाचा -नवी मुंबईत नोकरीचे आमिष दाखवून लुटणारी टोळी गजाआड

हेही वाचा -ठाणे : प्रेमाची फूस लावून अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्याला बेड्या

Last Updated : Jan 11, 2021, 8:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details