महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी ; खड्डा चुकवताना झाला अपघात - कापुरबावडी पोलीस ठाणे बातमी

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने ठाण्यात पुन्हा मायलेकीचा बळी गेल्याने एकाच खळबळ उडाली आहे. तर ठाण्यातील घोडबंदर रोड हा खड्ड्यामुळे आणि भरधाव अवजड वाहनाच्या वर्दळीमुळे मृत्यूचा सापळा झाला आहे.

ठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी

By

Published : Oct 11, 2019, 10:36 PM IST

ठाणे- पत्नी आणि मुलीसह आपल्या घराकडे दुचाकीवर निघालेल्या परिवाराचा रस्त्यावरील खड्ड्याने घात केला. खड्डा वाचविण्यासाठी केलेल्या खटाटोपात रस्त्यावर पडलेल्या मायलेकी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रेलर खाली आल्याने त्यांचा मृत्यू झाला. ठाण्यात पुन्हा रस्त्यावरील खड्ड्याने मायलेकीचा बळी घेतला. या प्रकरणी कासार वडवली पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास आणि अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यात येत आहे.

ठाण्यात पुन्हा खड्ड्याने घेतला माय-लेकीचा बळी

दरम्यान, अपघात ट्रेलरच्या धडकेने की खड्ड्यामुळे? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, खड्डा वाचाविण्याचा प्रयत्न करतानाच विश्वकर्मा परिवार खाली पडून ट्रेलरखाली आल्याचे स्थानिक प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितले आहे. गुरुवारी रात्री रस्त्यावरील खड्ड्याने मायलेकीच्या दुर्दैवी अपघाती निधनाने ठाण्यात रस्त्यांची चाळण झाल्याचा आणि वाहन चालविणाऱ्या दुचाकी चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाण्याच्या ब्रम्हांड परिसरात राहणारे विश्वकर्मा परिवार हे गुरुवारी कामानिमित्त मिरारोड येथे गेले होते. रात्रीच्या परतीच्या प्रवासात दुचाकीवरुन चंद्रावती विश्वकर्मा (वय३१) चिमुरडी प्रांजल (वय३) आणि दिलीप विश्वकर्मा (वय३३) हे दुचाकीवरुन गुरुवारी रात्री ठाण्याकडे येत होते. रात्रीच्या ११ वाजण्याच्या सुमारास भाईंदर पाडा येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने दिलीप यांचा तोल गेला. तिघेही खाली पडले. मात्र, मागे बसलेले प्रांजल आणि चंन्द्रावती हे थोडे गाडी पासून लांब पडले. दरम्यान, मागून येणारा ट्रेलर खाली मायलेकी आल्याने चंद्रावती फरफटत दूरवर गेली. अक्षरशः तिच्या शरीराचा खिमा झाला. तर प्रांजलच्या डोक्याला गंभीर इजा झाली. अपघात घडतच रस्त्यालगत असलेल्या लोकांनी मात्र त्वरीत मदत कार्य करीत चिमुरडी प्रांजल हिला वेदांत रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तपासणीनंतर प्रांजलची परिस्थिती क्रिटीकल झाल्याने तिला मानपाडा येथील मेट्रो रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत प्रांजलीची ज्योत मावळली. मायलेकीच्या या मृत्यू प्रकरणी कापुरबावडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्याने ठाण्यात पुन्हा मायलेकीचा बळी गेल्याने एकाच खळबळ उडाली आहे. तर ठाण्यातील घोडबंदर रोड हा खड्ड्यामुळे आणि भरधाव अवजड वाहनाच्या वर्दळीमुळे मृत्यूचा सापळा झाला आहे. अनेक अपघाताची मालिकाच या परिसरात घडलेली आहे. रस्त्यावरील खड्डे, मेट्रोची कामे यामुळे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रेलर आणि अवजड वाहनाची भरमार घोडबंदर रोडवर रात्री मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे अपघात हे नित्याचे झालेले आहेत. मात्र, गुरुवारी रात्रीच्या अपघाताने दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या चालकाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details