ठाणे- गडकरी रंगायतनसमोर चौकात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून जाहीर निषेध केला. माफी मागायला नकार देत "मी राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे, मी माफी मागणार नाही' या राहुल गांधींच्या वक्तव्याविरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
ठाण्यात राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध, जाळला प्रतिकात्मक पुतळा - Thane latest news
'सावरकरजी के सम्मान में, एबीवीपी मैदान में' अशा घोषणा देत आंदोलकांनी राहुल गांधीचा निषेध केला. सावरकर हे अखंड भारताचे आराध्यदैवत आहे आणि त्यांचा अपमान हा स्वतंत्र भारताचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, असे आंदोलकांनी सांगितले.
ठाण्यात राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध
हेही वाचा - रुग्णवाहिका नसल्याने तडफडणाऱ्या जखमीला नेले लोकलमधून
'सावरकरजी के सम्मान में, एबीवीपी मैदान में' अशा घोषणा देत आंदोलकांनी राहुल गांधीचा निषेध केला. सावरकर हे अखंड भारताचे आराध्यदैवत आहे आणि त्यांचा अपमान हा स्वतंत्र भारताचा अपमान आहे. महाराष्ट्राचा अपमान आहे, असे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात सहभागी 8 कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.