महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आसाराम बापूच्या आश्रमातील सेवेकरी महिलेवर बलात्कार, आरोपी गजाआड - आसाराम बापूच्या आश्रमात सेवेकरी असलेल्या महिलेवर बलात्कार बातमी

आसाराम बापूच्या आश्रमात सेवेकरी असलेल्या ५० वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. सदर पीडितेने याप्रकरणी पिडित महिलेने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे नराधमाला कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.

आसाराम बापूच्या आश्रमातील ५० वर्षीय सेवेकरी महिलेवर बलात्कार करणारा गजाआड

By

Published : Sep 29, 2019, 12:55 PM IST

ठाणे -आसाराम बापूच्या आश्रमात सेवेकरी असलेल्या ५० वर्षीय महिलेवर एका नराधमाने बलात्कार केल्याची घटना घडली. सदर महिला ही आश्रमातील सेवेचे काम आटोपून रात्रीच्या सुमारास पायी घराकडे जात होती. त्यावेळी निर्जन रस्त्यात एका नराधमाने पीडितेला फरफटत रस्त्याच्या कडेला झाडीझुडपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. लखन देवकर (३०) असे नराधमाचे नाव असून तो ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करतो. सदर घटना कल्याण-मुरबाड मार्गावरील पाचवा मैल परिसरात घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याच्या आधारे नराधमाला कल्याण तालुका पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.


पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला उल्हासनगरमध्ये राहत असून ती कल्याण - मुरबाड रोडवरील असलेल्या रायते गावातील आसाराम बापू आश्रमात सेवेकरीचे काम करते. पीडित महिलेचा पती तिला सोडून जर्मनीला निघून गेला आहे. त्यामुळे पीडिता एकटीच राहून आश्रमात सेवेचे काम करते. ती दररोज उल्हासनगरहून आश्रमात पायी ये-जा करते. २३ सप्टेंबर रोजी नेहमीप्रमाणे पीडित महिला रात्री ८ च्या सुमारास आश्रमातील सेवेचे काम आटोपून घरी चालत निघाली होती. त्यावेळी निर्जन रस्त्यात नराधम लखन याने जबरदस्तीने पीडितेला फरफटत रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीझुडपात नेले. यावेळी पीडितेने प्रतिकार करीत त्याच्या छातीला चावा घेऊन त्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने पीडितेला मारहाण करून धमकी देत बळजबरीने तिच्यावर बलात्कार केला. तसेच अत्याचार करून घटनास्थळावरुन पळ काढताना पीडीत महिलेची पर्स, छत्री, जेवणाचा डबा सुद्धा घेऊन पळाला.

हेही वाचा - सप्तश्रृंगीगड नवरात्रोत्सवासाठी सज्ज


याप्रकरणी पीडित महिलेने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याण तालुका पोलिसांनी तपासासाठी ४ शोध पथके तयार केली. तपासात पाचवा मैल परिसरात पोलिसांनी काही तरुणांची विचारपूस केली. या चौकशी दरम्यान ज्या वर्णनाच्या तरुणाचा शोध पोलीस घेत होते त्याचा एक मित्र पोलिसांच्या हाती लागला. त्याने सांगितले की, घटनेच्या दिवशी त्याच परिसरात राहणारा त्याचा एक मित्र आरोपी लखन त्याला घेऊन एका ठिकाणी गेला होता. त्या ठिकाणी त्याच्या खिशातील पाकीट पडले होते, इतकेच नाही तर नराधम लखनकडे एका महिलेची पर्स होती. लखनने ती पर्स त्याच्या मैत्रिणीची आहे असे सांगितले होते.

हेही वाचा - भिवंडीत दोन 'दारुवाल्या आंटींना' अटक; घरातील गावठी दारूसह हातभट्टी केली नष्ट
पोलिसांनी तपासाची सूत्रे या दिशेने फिरवली आणि अखेर त्या सेवेकरी महिलेवर बलात्कार करणारा आरोपी लखन देवकर हाच असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आहे. घटनास्थळी बलात्कार केल्यावर तो पीडित महिलेची पर्स, छत्री, जेवणाचा डबासुद्धा घेऊन पळाला होता. मात्र, स्वतःचे पाकीट त्याठिकाणी विसरल्याने तो आपल्या मित्रासोबत परत घटनास्थळी पाकीट परत घ्यायला गेला होता.

हेही वाचा - साम्राज्य अबाधित राखण्यासाठी कलानी कुटुंबाची धडपड; ज्योती कलानीचा राजीनामा
आरोपीने त्याने सगळे पुरावे आपल्यासोबत ठेवले होते, त्यामुळे त्याला पोलिसांच्या हाती लागणार नसल्याची खात्री होती. मात्र, घटनास्थळी खिशातून पडलेले पाकीट घेण्यासाठी तो मित्रासोबत गेला आणि पोलिसांना हाच सुगावा, त्याच्यापर्यंत पोहचविण्यास नामी ठरला. त्यांनतर शनिवारी दुपारी जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे जाऊन कल्याण तालुका पोलिसांनी नराधम लखनच्या मुसक्या आवळल्या.

हेही वाचा - रणधुमाळी विधानसभेची : निवडणूक जिंकण्यासाठी शिवसेना करतीय 'क्लस्टर' प्रचार

ABOUT THE AUTHOR

...view details