ठाणे :छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे, कार्याचे संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात कौतुक होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडणारी अनोखी कला आज साकारण्यात आली आहे. शिवजयंती निमित्त लाकडाच्या तुकड्यावर महाराजांचे नाव कोरले असून त्यात पुस्तके ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या अनोख्या कलाकृतीचा आविष्कार पाहण्यासाठी शिवपेमी येथे गर्दी होत आहे.
4 फूट लांबी, 40 फूट रुंदीचा ग्रंथ आराखडा :आज महाराष्ट्रासह देशभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होत आहे. प्रत्येकजण छत्रपती शिवाजी महाराजांचा वेगवेगळ्या पद्धतीने विचार मांडून त्यांचा सन्मान करत आहे. परंतु कल्याण पूर्व येथील सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळाच्या माध्यमातून जरीमरी मंदिर तिसगाव येथे 4 फूट लांबी, 40 फूट रुंदीचा ग्रंथ आराखडा तयार करण्यात आला आहे. अंदाजे 3 हजार पुस्तके ठेवण्याची यात व्यवस्था आहे. यावेळी नागरिकांनी वाचनीय, शालेय उपयुक्त पुस्तके आणावीत, असे आवाहन मंडळाने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत कालपासून अनेक नागरिकांनी या ले-आऊटमध्ये पुस्तके आणली असून ही मांडणी अतिशय रेखीव दिसत आहे.