वसई/विरार - नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेने 3 वर्षानंतर एका हत्येच्या गुन्ह्याची उकल करीत आरोपीला अटक केली आहे. आपल्या आईवडिलांवर हल्ला करत आईची हत्या करून करून आरोपी पसार झाला होता. तब्बल ३ वर्षांनी पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क परिसरात राहणाऱ्या जन्मेश पवार या आरोपीने शेअर मार्केट मध्ये तीन वर्षांपूर्वी पैसे गुंतवले होते. त्यात त्याला मोठे नुकसान झाले. यामुळे त्याचे वडील आणि त्याचात खडके उडायला लागले. वडिलांवरील रागाच्या भरात २९ फेब्रुवारी २०१९ रोजी आई-वडील झोपले असताना त्यांच्यावर चाकूने आणि स्क्रूड्रायव्हर ने हल्ला केला. त्यात वडील गंभीर जखमी झाले तर आई जागीच ठार झाली.
सख्या आईची हत्या करून फरारी झालेला आरोपी तीन वर्षानंतर गजाआड - killed his own mother
आपल्या आईवडिलांवर हल्ला करत आईची हत्या करून करून आरोपी पसार झाला होता. तब्बल ३ वर्षांनी पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. नालासोपारा पश्चिमेकडील पाटणकर पार्क परिसरात राहणाऱ्या जन्मेश पवार या आरोपीने शेअर मार्केट मध्ये तीन वर्षांपूर्वी पैसे गुंतवले होते. त्यात त्याला मोठे नुकसान झाले. यामुळे त्याचे वडील आणि त्याचात खडके उडायला लागले. वडिलांवरील रागाच्या भरात २९ फेब्रुवारी २०१९ रोजी आई-वडील झोपले असताना त्यांच्यावर चाकूने आणि स्क्रूड्रायव्हर ने हल्ला केला. त्यात वडील गंभीर जखमी झाले तर आई जागीच ठार झाली.
यानंतर तो फरार झाला होता. जन्मेशच्या वडिलांनी त्याच्या विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलीस मागील तीन वर्षापासून त्याचा शोध घेत होते. पण तो पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. शेवटी एका गुप्त बातमीदाराच्या मदतीने पश्चिम बंगाल मधून याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी माहिती दिली की, जन्मेश हा उच्च शिक्षित असल्याने त्याचे इंग्रजी भाषेवर चांगले प्रभुत्व आहे. यामुळे त्याला हॉटेल, मॉल या ठिकाणी सहज नोकरी मिळत असे. तो एका ठिकाणी केवळ सहा महिने काम करत असे. त्याला तंत्रज्ञान आणि माहिती विषयातील चांगली माहिती असल्याने त्याने कधीच स्मार्ट फोन वा समाज माध्यमांचा वापर केला नाही. त्यामुळे त्याचे ठिकाण माहीत पडत नव्हते. त्याने आतापर्यंत गुजरात, नोएडा, बनारस तसेच नेपाळ आणि बांगलादेशात सुद्धा वाऱ्या केल्या आहेत.
त्याच्या इंग्रजीच्या प्रभूत्वामुळे समोरच्या व्यक्तीवर छाप पडत असे. त्यामुळे तो कुठेही आपला ठिकाणा तयार करत असे. पोलिसांनी सर्व गुप्त माहितीदारांना सक्रीय करून त्याची माहिती मिळवली. तेव्हा तो बंगालमधील एका मॉलमध्ये काम करत असल्याचे त्यांना समजले. पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.