महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Coronavirus : नवी मुंबईत आज 94 कोरोनाबधितांची नोंद, तर 98 जणांना डिस्चार्ज

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्रं नवी मुंबईत दिसून येत आहे

Navi Mumbai Corona News
Navi Mumbai Corona News

By

Published : May 31, 2020, 10:24 PM IST

नवी मुंबई - शहरात दिवसेंदिवस कोरोनाचा कहर वाढत आहे. आज (रविवारी) 94 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर 98 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

नवी मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अत्यावश्यक सेवेत व एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्रं नवी मुंबईत दिसून येत आहे.

कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे, असे चित्र नवी मुंबई शहरात दिसून आले आहे. मात्र, वाढते रूग्ण रोखण्यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहेत. आत्तापर्यंत शहरात 2 हजार 215 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते.

आत्तापर्यंत नवी मुंबईत 11 हजार 749 लोकांची कोविड 19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 8 हजार 886 जण निगेटिव्ह आले असून, 659 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे. सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 2 हजार 204 इतकी आहे.

आज 94 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे मधील 4, बेलापूर मधील 4, कोपरखैरणे मधील 32, नेरुळ मधील 6 व वाशीतील 9, घणसोली मधील 11, ऐरोली मधील 24, दिघ्यामधील 4, असे एकूण 94 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये 39 स्त्रिया व 55 पुरुषांचा समावेश आहे.

तर आत्तापर्यंत नवी मुंबईत 1 हजार 346 व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन आपल्या घरी परतल्या आहेत. तर आज नेरूळ मधील 12 , बेलापूर मधील 20, वाशीमधील 6, तुर्भे मधील 25, कोपरखैरणे मधील 16, घणसोली मधील 9, ऐरोलीमधील 6 व दिघ्यात 4 अशा एकूण 98 व्यक्ती आज कोरोना मुक्त झाल्या असून, बऱ्या होऊन घरी परतल्या आहेत. यामध्ये 34 स्त्रिया आणि 64 पुरुषांचा समावेश आहे. शहरात सद्यस्थिती मध्ये 785 व्यक्तींवर कोरोनाचे उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 73 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details