ठाणे - पैसे पडल्याची बतावणी करून ८६ हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली. भिवंडी तालुक्यातील कुकसे गावातील शेतकरी संदीप ठाकरे हे आपल्या मित्रांसमवेत कारमधून न्यायालयीन कामकाजासाठी शनिवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी ही घटना घडली.
गाडीखाली पैसे पडल्याचे बतावणी करून शेतकऱ्याला लुटले; ८६ हजार लंपास
संदीप आणि त्यांचे मित्र न्यायालयीन कामकाज आटोपून सायंकाळी परतताना नौपाडा परिसरात खरेदीसाठी आले होते. गावदेवी परिसरात कार पार्क करून ठाकरे गाडीत बसून होते, तर, त्यांचे दोघे मित्र खरेदीसाठी गेले होते.
संदीप आणि त्यांचे मित्र न्यायालयीन कामकाज आटोपून सायंकाळी परतताना नौपाडा परिसरात खरेदीसाठी आले होते. गावदेवी परिसरात कार पार्क करून ठाकरे गाडीत बसून होते, तर, त्यांचे दोघे मित्र खरेदीसाठी गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास एका भामट्याने ठाकरे यांचे लक्ष वेधून घेत गाडीखाली पैसे पडल्याचे सांगितले. ठाकरे जेव्हा पैसे उचलण्यासाठी गाडीखाली उतरले असता, त्याचवेळी दुसऱ्या दिशेकडील तिघा भामट्यांनी गाडीमधील बॅग लांबवली. या बॅगेत 80 हजाराची रोकड आणि ५ हजारांचे घड्याळ आणि इतर सामान असा एकूण ८६ हजाराचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवून पळ काढला. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात ४ अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.