ठाणे- कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी रविवारी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत ८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील शेतकरी मतदार संघातल्या गण क्रमांक १२ ची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या बूथ वरील मतपेटी सील केल्यानंतर मतपेटीतील मतपत्रिकाना आग लागल्याची घटना घडली. यामध्येकाही मतपत्रिका जळाल्याने अधिकाऱ्यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारांनी फेरमतदान घेण्याची मागणी केल्याने निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
नव्या शासन नियमानुसार केवळ शेतकऱ्यानांच बाजार समितीचा सभासद करण्यात येत आहे. त्यामध्ये १८ हजार ५३० मतदार समिती सदस्यांची निवड करणार आहेत. १८ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून यावर शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला आहे. मांडा, बल्याणी, बारावे, कल्याण, निळजे, नांदिवली तर्फे पाचनंद, फळेगाव, कुंदे, गोवेली, खडवली, टिटवाळा, बावेघर १२ गणामध्ये २९ ठिकाणी मतदान केंद्र असून १८ हजार ५३० मतदार बाजार समिती सदस्याची निवड करणारा आहेत. या १२ गणांमध्ये आज १६ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर सोमवारी मतमोजणी आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यत ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. २९ पैकी एक मतदान केंद्र बाजारसमितीच्या आवारात उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रावर संध्याकाळी साडेपाच वाजता मतपेटी सील करण्यात आली. सील केलेली मतपेटी स्ट्रोगरूममध्ये नेत असताना या पेटीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने या मतपेटीचे सील उघडून पाहणी केली असता मतपेटीतील मतपत्रिका जळत असल्याचे लक्षात आले. तातडीने हि आग विझविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली. त्यांनंतर असून आरोप प्रत्यारोपणा उधान आले.