ठाणे : कल्याण पश्चिम भागातील सुंदर रेसीडन्सी इमारतीच्या बी विंगमध्ये काही महिन्यापूर्वीच आरोपी नितीन कांबळे हा सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता. यादरम्यान मृतक प्रणव याची आई कविता बरोबर त्याची मैत्री झाली. (Child Kidnapping and Murder) त्यातच गेल्या काही दिवसांपासून आरोपी व मृतकच्या आईचे वाद सुरू होते. (Little Boy Murder In Thane) ९ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास आरोपी नितीनने प्रणव शाळेतून निघाल्यानंतर शाळेच्या गेटवरून बहाण्याने त्याचे अपहरण केले. त्यानंतर दुपारी १ वाजताच्या सुमारास प्रणवची गळा दाबून हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह इमारतीच्या गच्चीवर नेत पाण्याच्या टाकीत फेकून (body thrown into water tank) दिला. (Murder Accused Arrested)
आरोपीने लिहिली सुसाईड नोट :खळबळजनक बाब म्हणजे आरोपीने हत्येचे दुष्कृत्य लपविण्यासाठी बनाव करत आपल्या फेसबुक अकांउंटवर सुसाईट नोट लिहीली. त्यामध्ये कविताने आपल्याकडून ५० हजार रुपये घेतले असून वारंवार मागणी करूनही ती पैसे परत देत नाही. शिवाय तिच्या आईकडून आपला अपमान होत असल्याने आपण आत्महत्या करत असल्याची सुसाईट नोट व्हायरल केली. एवढेच नव्हे तर आरोपीने खडकपाडा पोलीस ठाणे गाठत आपण कविता नामक महिलेच्या त्रासाला कंटाळून विषारी गोळ्या खाल्याचे सांगितले.